श्रीनगर - जम्मू काश्मीरमधील शोपियन जिल्ह्यामध्ये एका पोलीस कर्मचाऱ्याचेच अपहरण झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. संशयित दहशतवाद्यांनी गुरुवारी रात्री सायंकाळी एका पोलीस कर्मचाऱ्याचे त्याच्या राहत्या घरातून अपहरण केल्याची माहिती आहे.
जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी केले पोलीस कर्मचाऱ्याचे अपहरण - जम्मू काश्मीर
जम्मू काश्मीरमधील शोपियन जिल्ह्यामध्ये एका पोलीस कर्मचाऱ्याचेच अपहरण झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
जम्मू काश्मीरमध्ये अतिरेक्यांनी केले पोलीस कर्मचाऱयाचे अपहरण
जावेद अहमद पैरी असे संबधित पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. चतवतन येथील राहत्या घरातून जावेदचे अज्ञात बंदूकधार्यांनी अपहरण केले. जावेद हे श्रीनगरमधील एसडीपीओ झाकुरा येथे कार्यरत आहेत. जावेद यांचे अपहरण झाल्यानंतर सुरक्षा दलांनी सर्च ऑपरेशन सुरू केले.