नवी दिल्ली - भाजपच्या ज्येष्ठ नेत्या आणि माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांचे काल (मंगळवारी) हृदविकारच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या जाण्याने सबंध भारत देश दु:खात आहे. सुषमा स्वराज परराष्ट्रमंत्री असताना सोशल मीडियावरुन अडचणीत असलेल्यांना मदत करण्यासाठी लोकप्रिय होत्या. परराष्ट्रमंत्री असताना त्यांनी खऱ्या अर्थाने भारतीय दुतावास सर्वसामान्य नागरिकांसाठी असल्याचे दाखवून दिले.
परदेशामध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांच्या समस्या ते ट्विटरद्वारे सोडवत. कोणीही त्यांना ट्विटरवरुन पासपोर्ट किंवा व्हिसाबद्दल तक्रार केली किंवा मदत मागितली तर सुषमा स्वराज तत्काळ उत्तर देत. त्यांच्या सुटकेसाठी प्रयत्न करत. अशा प्रकारे मदत करत त्यांनी अनेक लोकांना सुरक्षित भारतात आणले. त्यांच्या या मदतीमुळे अनेकजण त्यांना धन्यवाद देत असत, मात्र, हे माझे कामच असल्याचे नम्र उत्तर त्या देत असत..
इराकमध्ये अडकेलेल्या १४० नागरिाकांची सुटका
युएईमध्ये अडकेलल्या एका मुलीची सुटका