नवी दिल्ली - माजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांना छातीत दुखण्याची तक्रार आल्यानंतर मंगळवारी रात्री एम्समध्ये दाखल करण्यात आले होते. परंतू त्यांचे निधन झाले आहे. भाजपच्या झंजावात असणाऱ्या सुषमा स्वराज यांचा जीवनप्रवास हा नक्कीच थक्क करणारा आहे.
सुषमा स्वराज यांचा राजकीय प्रवास - सुषमा स्वराज यांचे निधन,
माजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांचे निधन झाले आहे. भाजपच्या झंजावाती नेत्या म्हणून त्या ओळखल्या जात होत्या.
माजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांचे निधन
सुषमा स्वराज यांचा राजकीय प्रवास
- भारतीय जनता पक्षाच्या त्या प्रमुख महिला नेत्या होत्या
- १९७७ मध्ये २५ वर्षांच्या वयात त्या भारताच्या उत्तरेकडील राज्य असणाऱ्या हरियाणातील सर्वात तरुण कॅबिनेट मंत्री बनल्या
- अटलबिहारी वाजपेयी सरकारमध्ये माहिती आणि प्रसारणमंत्री, दूरसंचारमंत्री, आरोग्यमंत्री आणि संसदीय कार्यमंत्री ही मंत्रिपदे सांभाळली होती
- दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री म्हणून १३ ऑक्टोबर १९९८ ते ३ डिसेंबर १९९८ पर्यंत कार्यभार पाहिला
- लोकसभेच्या २१ डिसेंबर २००९ ते २६ मे २०१४ विरोधी पक्षनेत्या राहिल्या आहेत
- २०१४ च्या सार्वत्रिक निवडणुकीत त्या दुसऱ्यांदा मध्य प्रदेशातील विदिशा मतदारसंघातून जिंकून आल्या होत्या.
- मोदी सरकारच्या पहिल्या कालखंडात त्या परराष्ट्रमंत्री म्हणून कार्यरत होत्या
मागील काही दिवसांपासून त्या आजारी होत्या यामुळे राजकीय प्रक्रियातून त्या दूर असल्याचे दिसत होत्या. पण समाजमाध्यमांद्वारे त्या मत मांडत असत.
Last Updated : Aug 6, 2019, 11:56 PM IST