नवी दिल्ली - भारताने पाकिस्तानवर केलेल्या हवाई हल्ल्यानंतर परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी सर्व पक्षीय बैठक बोलावली होती. या घटनेची अधिकृत माहिती यावेळी त्यांनी या बैठकीमध्ये दिली. यावेळी सर्व पक्षांनी भारतीय वायु दलाचे आणि दहशतवाद विरोधी कारवाईचे एक सुरात स्वागत केले. याबद्दल स्वराज त्यांनी आनंद व्यक्त केला आहे.
पाकिस्तानच्या बालाकोट येथील दहशतवादी तळांवर आज पहाटे भारतीय वायुसेनेने हल्ला चढवला होता. मिराज-२००० या विमानाचा वापर करुन तब्बल १००० किलोचे बॉम्ब या तळांवर डागले होते. या घटनेमुळे संपूर्ण देशात उत्साहाचे वातावरण आहे. त्यानंतर या कारवाईची अधिकृत माहिती देण्यासाठी सुषमा स्वराज यांनी सर्व पक्षीय बैठक बोलावली होती. या बैठकीला गृहमंत्री राजनाथ सिंह, अर्थमंत्री अरुण जेटली, संसदीय कार्य राज्यमंत्री विजय गोयल आणि सर्व मोठ्या पक्षाचे नेते उपस्थित होते.