महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

एनडीएच्या आमदारांना खरेदी करण्याचा लालूंकडून प्रयत्न; सुशीलकुमार मोदींचा दावा - सुशीलकुमार मोदी यांची लालूंवर टीका

राष्ट्रीय जनता दलाचे सर्वेसर्वा लालूप्रसाद यादव हे एनडीएचे आमदार खरेदी करत असल्याचा आरोप बिहारचे माजी उपमुख्यमंत्री व भाजपाचे नेते सुशीलकुमार मोदी यांनी केला आहे. टि्वट करून त्यांनी हा आरोप केला आहे.

बिहार
बिहार

By

Published : Nov 25, 2020, 1:13 PM IST

पाटणा - बिहार विधानसभा निवडणुकीमध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत मिळाले असून मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्त्वात सरकार स्थापन झाले आहे. मात्र, राज्यातील सरकार पाडण्याचा कट राष्ट्रीय जनता दलाचे सर्वेसर्वा लालूप्रसाद यादव रचत असल्याचा गौप्यस्फोट बिहारचे माजी उपमुख्यमंत्री व भाजपाचे नेते सुशीलकुमार मोदी यांनी केला आहे. त्यांनी टि्वट करून एक ऑडिओ क्लिप शेअर केली आहे.

बिहार विधानसभा अध्यक्षपदासाठी होत असलेल्या निवडणुकीमध्ये महागठबंधनच्या बाजूने मतदान करण्यासाठी, लालूप्रसाद यादव एनडीएच्या आमदारांना फोन करून त्यांना मंत्रीपदाचंआमिष दाखवत आहेत, असे टि्वट सुशील मोदी यांनीकेले आहे.

मी फोन केला, तेव्हा तो कॉल थेट लालूप्रसाद यादव यांनी उचलला होता. कारागृहात बसून, अशा घाणेरड्या राजकीय डाव खेळू नका. अशा चालींना यश येणार नाही असे मी त्यांना सांगितले, असे मोदींनी म्हटले आहे.

सुशील मोदींच्या आरोपांमध्ये किती तथ्य ?

सुशील मोदी यांनी टि्वटमध्ये दिलेल्या नंबरवर संपर्क साधण्याचा प्रयत्न ईटीव्ही भारतने केला. मात्र, संबधित नंबरचे लोकेशन कर्नाटकातील बंगळुरूमध्ये येत आहे. त्यामुळे सुशील मोदी यांनी केलेल्या आरोपांमुळे कारागृह प्रशासनावर प्रश्न उपस्थित झाले आहेत. मोदींच्या आरोपांवर रांची कारागृह प्रशासन काय प्रतिक्रिया देत हे पाहणे महत्त्वाचे आहे.

या नंबरवरून लालूंनी साधला एनडीएच्या आमदारांशी संपर्क; सुशील मोदींचा दावा

कोणाला किती जागा -

तीन टप्प्यांत झालेल्या बिहार विधानसभा निवडणुकीचा 10 नोव्हेंबरला निकाल समोर आला. 243 मतदारसंघासाठी झालेल्या या निवडणुकीत एनडीएला काठावरचे बहुमत मिळाले आहे. तर राष्ट्रीय जनता दल सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडीला (एनडीए) 125 जागा मिळाल्या आहेत. तर महागठबंधनला 110 जागांवर समाधान मानावे लागले. एनडीएत भाजपाला 74 जागा मिळाल्या आहेत. तर जनता दल (यू) 43, हिंदुस्तान आवाम मोर्चा (सेक्युलर) आणि विकासशील इन्सान पार्टीने प्रत्येकी 4 जागांवर विजय मिळवला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details