मुंबई -सुशांत सिंह राजपूतच्याअंत्यसंस्कारास २४ तास झाले नाही, तेवढ्यातच सुशांतच्या परिवाराला आणखी एक धक्का बसला आहे. सुशांतची वहिनी सुधा देवीचा मृत्यू झाला आहे. बिहारच्या पूर्णिया येथे त्या राहत होत्या. आधीच त्यांची तब्येत ठिक नव्हती. त्यात सुशांतच्या आत्महत्येच्या वृत्तानंतर त्यांना अधिकच धक्का बसला. त्यानंतर त्यांच्या मृत्यूची बातमी समोर आली. सोमवारी रात्री उशिरा त्यांच्या मृत्यूबद्दल समजले. पूर्णियाच्या मलडीहा गावात ही घटना घडली. सुशांतच्या परिवाराने या बातमीला दुजोर दिला आहे.
अभिनेता सुशांतच्या मृत्यूच्या धक्क्याने त्याच्या वहिनीचाही मृत्यू - Sushant Singh Rajput's sister-in-law passes
सुशांतच्या बहिणीने, गेल्या ५ महिन्यांपासून सुशांतच्या डिप्रेशनवर इलाज सुरू असल्याचे सांगितले होते. ५ दिवसांपूर्वी त्याचे बहिणीशी फोनवर बोलणे झाले होते. त्यावेळी सुशांतने त्याची तब्येत ठीक नसल्याचे सांगितले होते.
सुशांत सिंह राजपूत
सुशांतच्या बहिणीने, गेल्या ५ महिन्यांपासून सुशांतच्या डिप्रेशनवर इलाज सुरू असल्याचे सांगितले होते. ५ दिवसांपूर्वी त्याचे बहिणीशी फोनवर बोलणे झाले होते. त्यावेळी सुशांतने त्याची तब्येत ठीक नसल्याचे सांगितले होते. त्यानंतर सुशांतची बहीण त्याच्या मुंबईतल्या घरी आली होती. ती २ दिवस त्याच्याकडे राहिली.