गांधीनगर -बलात्काराचा दोष सिद्ध झाल्यानंतर आसारमपुत्र नारायण साई याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. २०१३ मध्ये दाखल करण्यात आलेल्या खटल्यावर सुनावणी करताना सुरत सत्र न्यायालयाने हा निर्णय दिला. यापूर्वी २६ एप्रिलला न्यायालयाने त्याला दोषी सिद्ध केले होते. सुरत येथील दोन बहिणींनी नारायण साईंवर बलात्काराचा खटला दाखल केला होता.
आसारामपुत्र नारायण साईला जन्मठेप; 'त्या' दोन बहिणींच्या बलात्कार प्रकरणात न्याय - Asaram Bapu
नारायण साईला हरियाणाच्या कुरुक्षेत्र येथून २०१३ला अटक करण्यात आली होती. त्यांच्याविरोधात सुरतच्या दोन बहिणींनी साई आणि आसाराम विरोधात बलात्काराचा खटला दाखल केला होता. त्या दोघींना आज सुरत सत्र न्यायालयाने न्याय दिला आहे.
नारायण साईला हरियाणाच्या कुरुक्षेत्र येथून २०१३ला अटक करण्यात आली होती. त्यांच्याविरोधात सुरतच्या दोन बहिणींनी साई आणि आसाराम विरोधात बलात्काराचा खटला दाखल केला होता. यापैकी एका बहिणीने आपण २००२ ते २००५मध्ये सुरत येथील आश्रमात राहात असताना नारायण साईने आपल्यावर बलात्कार केल्याचे म्हटले होते. तर, दुसरीने १९९७ ते २००६ दरम्यान आश्रमात असताना आपल्यावर अत्याचार झाला होता, असे सांगितले होते.
दोन्ही बहिणींना झालेल्या अत्याचारावर वेगवेगळी तक्रार नोंदवली होती. त्यानंतर पोलिसांनी दोघांच्याही आश्रमांना टाळे ठोकले होते. त्याच्याबरोबर इतर ४ व्यक्तींनाही अटक करण्यात आली होती. सुरत न्यायालयाने निर्णय दिल्यानंतर आता साई उच्च न्यायालयात आव्हान करण्याचे संकेत आहेत.