महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

आयएनएक्स माध्यम प्रकरण : पी. चिदंबरम यांच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी - आयएनएक्स माध्यम प्रकरण

आयएनएक्स माध्यम व्यवहार प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात आज (शुक्रवारी) सुनावणी होणार आहे.

पी. चिदंबरम

By

Published : Aug 23, 2019, 10:17 AM IST

नवी दिल्ली - आयएनएक्स माध्यम व्यवहार प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात आज (शुक्रवारी) सुनावणी होणार आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने जामीन नाकारल्यानंतर पी. चिदंबरम सीबीआय कोठडीमध्ये आहेत. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आर. बानूमठी यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठ या प्रकरणावर सुनावणी घेणार आहे.

चिदंबरम यांना बुधवारी सीबीआयने ताब्यात घेतले आहे. भ्रष्टाचार विरोधी विशेष न्यायालयाने चिदंबरम यांना २६ ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

चिदंबरम यांची चौकशी करण्यासाठी कोठडी गरजेची असल्याचे सीबीआयने विषेश न्यायालयात सांगितले होते. सर्व गोष्टींची शहानिशा केल्यानंतर न्यायालयाने चिदंबरम यांना कोठडी देण्याची मागणी मान्य केली. मात्र, वकिलांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना दररोज ३० मिनिटे भेट घेण्यास न्यायालयाने मान्यता दिली. तसेच दर ४८ तासाला त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात येणार आहे.

न्यायामूर्ती ए. एस बोपन्ना यांचा न्यायाधीश आर. बानूमठी यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठामध्ये समावेश आहे. शुक्रवारी याचिकेवर सुनावणी होणार असल्याचे सर्वोच्च न्यायालयाचे रजिट्रार यांनी पी. चिदंबरम यांच्या वकिलांना सांगितले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details