नवी दिल्ली -निर्भया बलात्कार प्रकरणातील दोषी विनय शर्माची दया याचिका राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी फेटाळली होती. त्यानंतर विनयने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. संबधित याचिकेवर गुरुवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.
विनय शर्माच्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी - plea of Vinay Sharma
दोषी विनय शर्माने फाशीची शिक्षा ही जन्मठेपेच्या शिक्षेत रूपांतरित करण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती. त्यावर सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी होणार आहे.
दोषी विनय शर्माने फाशीची शिक्षा ही जन्मठेपेच्या शिक्षेत रूपांतरित करण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयातदाखल केली होती. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी 1 फेब्रुवारीला विनय शर्माची दया याचिका फेटाळली होती.
निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणातील दोषींची फाशी कायदेशीर प्रक्रियेत अडकली आहे. कारण, दोषी आपली फाशीची शिक्षा लांबविण्यासाठी रोज नवे पर्याय शोधत आहेत. दोषी पवनने अद्याप राष्ट्रपतीकडे दया याचिका दाखल केलेली नाही. त्यामुळे त्याच्याकडे दया याचिका दाखल करण्याचा पर्याय आहे.