INX मीडिया प्रकरण : पी. चिदंबरम यांच्या जामीन याचिकेवर उद्या सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय - पी. चिंदबरम बातमी
काँग्रेस नेते आणि माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांच्या जामीन याचिकेवर सर्वोच्च न्यायालय उद्या (बुधवारी) निर्णय देणार आहे.
पी. चिदंबरम
नवी दिल्ली- काँग्रेस नेते आणि माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांच्या जामीन याचिकेवर सर्वोच्च न्यायालय उद्या (बुधवारी) निर्णय देणार आहे. आयएनएक्स मीडिया गैरव्यवहारप्रकरणी सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) दाखल केलेल्या मनी लाँड्रीगच्या गुन्ह्यात ते तिहार तुरुंगामध्ये आहेत. त्यामुळे चिंदबरम यांना जामीन मिळणार की तुरुंगातील रवानगी आणखी वाढणार हे उद्या स्पष्ट होणार आहे.