नवी दिल्ली - ऑगस्टा वेस्टलँड व्हीव्हीआयपी हेलिकॉप्टर घोटाळाप्रकरणी सहआरोपी राजीव सक्सेना यांना विदेशात जाऊन उपचार घेण्यासाठी परवाणगी देणाऱ्या दिल्ली न्यायालयाच्या निर्णायविरोधात ईडीने याचिका दाखल केली होती. त्यावर उद्या मंगळवारी उच्च न्यायालयात सुणावणी होणार आहे.
ऑगस्टा वेस्टलँड प्रकरण : न्यायालयाच्या "या" निर्णायाविरोधात ईडीने दाखल केलेल्या याचिकेवर उद्या सुनावणी - appeal
ऑगस्टा वेस्टलँड व्हीव्हीआयपी हेलिकॉप्टर घोटाळाप्रकरणी सहआरोपी राजीव सक्सेना यांना विदेशात जाऊन उपचार घेण्यासाठी परवानगी देणाऱ्या दिल्ली न्यायालयाच्या निर्णायविरोधात ईडीने याचिका दाखल केली होती. त्यावर उद्या मंगळवारी उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.
![ऑगस्टा वेस्टलँड प्रकरण : न्यायालयाच्या "या" निर्णायाविरोधात ईडीने दाखल केलेल्या याचिकेवर उद्या सुनावणी](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-3646895-thumbnail-3x2-mayu.jpg)
राजीव सक्सेना यांना आजारी असल्यामुळे उपचारासाठी 25 जुन ते 27 जुलै दरम्यान यूके आणि दुबई येथे जाण्याची 10 जुन रोजी दिल्ली न्यायालयाने परवानगी दिली होती. याविरोधात अंमलबजावणी संचालनालयाने याचिका दाखल केली होती. त्यावर न्यायाधीश संजिव खन्ना आणि न्यायाधीश भूषण रामाकृष्णा गवई यांच्या खंडपीठासमोर मंगळवारी सुनावणी होणार आहे.
ऑगस्टा वेस्टलँड प्रकरणात राजीव सक्सेनांवर ९० कोटी रुपयांचा गैरव्यवहार केल्याचा आरोप आहे. काही दिवसांपूर्वीच सक्सेनाचे दुबईतून भारतात प्रत्यर्पण करण्यात आलेले होते. सक्सेनासोबत दीपक तलवारलाही भारतात आणल्या गेले होते. ऑगस्टा वेस्टलँड प्रकरणातील मुख्य आरोपी ख्रिस्तियन मिशेलचेही यापूर्वीच भारतात प्रत्यर्पण करण्यात आले आहे.