महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

राम जन्मभूमी व बाबरी मशीद प्रकरणी आज सर्वोच्च न्यायलयात सुनावणी - UP government

सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश रंजन गोगोई, न्यायमूर्ती एस. ए. बोबडे, न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड, न्यायमूर्ती अशोक भूषण आणि न्यायमुर्ती एस. अब्दुल नजीर यांचे संविधान पीठ या प्रकरणावर सुनावणी करत आहे.

सर्वोच्च न्यायालय

By

Published : Mar 8, 2019, 7:57 AM IST

नवी दिल्ली -राम जन्मभूमी आणि बाबरी मशीद प्रकरणावर मध्यस्थता करायची किंवा नाही, यावर सर्वोच्च न्यायालय आज सुनावणी करणार आहे. जर या प्रकरणात मध्यस्थता झालीच तर यासाठी सुत्र कुणाच्या हातात द्यावे? यावरही सर्वोच्च न्यायालयात आज विचार होण्याची शक्यता आहे. त्यासाठी मध्यस्थता करणाऱ्यांची नावे न्यायालयात देण्यात आलेली आहेत.

सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश रंजन गोगोई, न्यायमूर्ती एस. ए. बोबडे, न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड, न्यायमूर्ती अशोक भूषण आणि न्यायमुर्ती एस. अब्दुल नजीर यांचे संविधान पीठ या प्रकरणावर सुनावणी करत आहे. राम जन्म भूमी आणि बाबरी मशिदीवर दोन्ही पक्षाची लोकं अंतर्गत मध्यस्थता करून हा मुद्दा सोडवू शकतात का? यावर सर्वोच्च न्यायालयाचे सर्व लक्ष असणार आहे.

सर्वोच्च न्यायालय

निर्मोही आखाडा सोडला तर सर्व हिंदू पक्ष आणि उत्तर प्रदेश सरकार मध्यस्थतेच्या विरोधात आहे. हे प्रकरण राम जन्म भूमीशी संबंधित आहे. लोकांच्या भावनेशी तडजोड करता येणार नाही. जर मध्यस्थतेचा विचार न्यायालय करणार असेल तर मशीदीचे स्थान दुसरीकडे सूनिश्चीत करावे, असे राम लला विराजमान पक्षाचे म्हणणे आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details