नवी दिल्ली -राम मंदिर-बाबरी मशीद प्रकरणी शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. न्यायालयाने सर्व पक्षांना येत्या १७ ऑक्टोबरपर्यंत आपली बाजू मांडण्यास सांगितले आहे.
राम मंदिर-बाबरी मशीद प्रकरण : 'या' दिवशी होणार अंतिम सुनावणी , पक्षकारांना बाजू मांडण्याचे आदेश
राम मंदिर-बाबरी मशीद प्रकरणी शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. न्यायालयाने सर्व पक्षांना येत्या १७ ऑक्टोबर पर्यंत आपली बाजू मांडण्यास सांगितले आहे.
सर्वोच्च न्यायालयामध्ये ३७ व्या दिवशी राम मंदिर-बाबरी मशीद प्रकरणी सुनावणी झाली आहे. शुक्रवारी मुस्लिम पक्षाकडून आपली बाजू मांडण्यात आली. येत्या १४ ऑक्टोबरपर्यंत मुस्लिम पक्ष आपली बाजू मांडेल. त्यानंतर हिंदू पक्षांना २ दिवसांचा वेळ देण्यात येईल. १७ ऑक्टोबरला याप्रकरणी अंतीम सुनावणी केली जाईल, असे न्यायालयाने सांगितले आहे.
न्यायाधीश रंजन गोगोई १७ नोव्हेंबरला सेवा निवृत्त होणार आहेत. त्यामुळे या प्रकरणाचा निकाल तोपर्यंत येणे अपेक्षीत आहे. याप्रकरणी सलोख्याने तोडगा काढण्यासाठी मध्यस्थींची तीन सदस्यीय समिती नेमण्यात आली होती. मात्र, त्यातून उपाय न निघाल्यामुळे गेल्या ६ ऑगस्टपासून रोज सुनावणी होत आहे.