नवी दिल्ली - उन्नाव सामुहिक बलात्कार प्रकरणी आज (शुक्रवार) सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. पीडितेच्या काकाला उत्तरप्रदेशातील रायबरेली जेलमधून दिल्लीतील तिहाड जेलमध्ये हलवण्याचे आदेश न्यायाधीशांनी दिले आहेत. सुरक्षेच्या कारणास्तव हा निर्णय घेण्यात आला आहे.
उन्नाव प्रकरण : पीडितेच्या काकाला तिहाड जेलमध्ये हलवा - सर्वोच्च न्यायालय - उन्नाव
पीडितेच्या काकाला उत्तरप्रदेशातील रायबरेली जेलमधून दिल्लीतील तिहाड जेलमध्ये हलवण्याचे आदेश न्यायाधीशांनी दिले आहेत.
पीडितेच्या कुटुंबाला कोणत्याही आपत्कालीन परिस्थिती उद्भवली असेल तर, सेक्रेटरी जनरल यांना सांगून कोणत्याही वेळी न्यायालयात येऊ शकतात. पीडितेची प्रकृती अजूनही खराब आहे. याबाबत न्यायालयात माहिती देताना पीडितेच्या वकिलाने सांगितले, की पीडितेचे कुटुंब लखनौमध्येच उपचार करू इच्छित आहेत. प्रकृती अजूनही खराब असल्यामुळे कुंटुंब सध्या पीडितेला दिल्लीत नेण्यासाठी इच्छूक नाहीत.
सर्वोच्च न्यायालयाने न्यायाधीश धर्मेश शर्मा यांना उन्नाव बलात्कार प्रकरणाच्या सुनावणीची जबाबदारी सोपवली आहे. मुख्य न्यायाधीश रंजन गोगोई, न्यायाधीश दीपक गुप्ता आणि न्यायाधीश अनिरुद्ध बोस यांनी बंद खोलीतील सुनावणीत धर्मेश शर्मा यांचे नाव निश्चित केले. याआधी न्यायालयाने उन्नाव संबंधित सर्व ५ खटले दिल्लीत हलवले होते.