महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

भारतीय विद्यार्थी अडकले इंग्लडमध्ये, सर्वोच्च न्यायालयाने केंद्राकडे मागितले उत्तर

इंग्लमध्ये अडकेललेल्या भारतीय विद्यार्थ्यांना माघारी आणण्यासंबधी भारत सरकारकडून न्यायालयाने सविस्तर उत्तर मागविले आहे.

सर्वोच्च न्यायालय
सर्वोच्च न्यायालय

By

Published : Apr 7, 2020, 5:29 PM IST

नवी दिल्ली-जगभर कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झाला आहे. युरोपातील जर्मनी, स्पेन, इटली आणि इंग्लमध्येही कोरोनाचे हजारो रुग्ण आढळून आले आहेत. अनेक भारतीय विद्यार्थी लॉकडाऊनमुळे इंग्लंडमध्ये अडकून पडले आहेत. मात्र, विमानसेवा बंद असल्यामुळे त्यांना भारतात येता येत नाही. यासंबधी अॅडव्होकेट मधुरीमा मृदील यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.

यावर आज सुनावणी झाली. इंग्लंडमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना माघारी आणण्यासंबधी भारत सरकारकडून न्यायालयाने सविस्तर उत्तर मागितले आहे. विमानसेवा बंद असल्याने हजारो विद्यार्थी अडचणींचा सामना करत आहेत. इंग्लंडच नाही तर इतर अनेक देशांमध्ये भारतीय विद्यार्थी आणि नागरिक अडकून पडले आहेत. मात्र, वाहतूक व्यवस्था कोलमडून पडल्यामुळे त्यांना भारतात येता येत नाही.

इंग्लंडमध्ये आत्तापर्यंत 51 हजार कोरोनाग्रस्त आढळून आले असून पाच हजारांपेक्षा जास्त नागरिकांचा मृत्यू झाला आहे. इंग्लडचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनाही कोरोनाची लागण झाली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details