नवी दिल्ली - निर्भया बलात्कार प्रकरणातील दोषी विनय शर्माची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. दोषी विनय शर्माची दया याचिका राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी फेटाळल्यानंतर दोषी विनयने त्याविरोधात न्यायालयात याचिका दाखल केली होती.
निर्भया प्रकरण : दोषी विनय शर्माची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली
निर्भया बलात्कार प्रकरणातील दोषी विनय शर्माची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे.
निर्भया प्रकरण
घटनेच्या वेळी विनय शारीरिक व मानसिकदृष्ट्या निरोगी होता, असे वैद्यकीय अहवालात आढळून आले आहे, असे न्यायालयाने आपल्या आदेशामध्ये म्हटले. दरम्यान डेथ वारंट करण्यासंबधीत सुनावणी 17 फेब्रुवरीला होणार आहे.
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी 1 फेब्रुवारीला विनय शर्माची दया याचिका फेटाळली होती. दोषी विनय शर्माने फाशीची शिक्षा ही जन्मठेपेच्या शिक्षेत रूपांतरित करण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती.