महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

निर्भया प्रकरण : दोषी अक्षयचे क्युरेटिव्ह पिटिशन सर्वोच्च न्यायालयाने फेटाळले - Supreme Court dismisses Akshay petition

निर्भया बलात्कार प्रकरणातील चारही दोषींना १ फेब्रुवारीला फाशी देण्यात येणार आहे.

निर्भया प्रकरण
निर्भया प्रकरण

By

Published : Jan 30, 2020, 5:27 PM IST

नवी दिल्ली - निर्भया बलात्कार प्रकरणातील चारही दोषींना १ फेब्रुवारीला फाशी देण्यात येणार आहे. दरम्यान दोषी अक्षयने दाखल केलेले क्युरेटिव्ह पिटिशन गुरुवारी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळले आहे. तर दुसरा आरोपी विनय शर्मा याने राष्ट्रपतींकडे दया याचिका दाखल केली आहे.

निर्भया प्रकरण; दोषी अक्षयचे क्युरेटिव्ह पिटिशन सर्वोच्च न्यायालयाने फेटाळले

निर्भया प्रकरणातील दोषी आपली फाशीची शिक्षा लांबवण्यासाठी रोज नवे पर्याय शोधत आहेत. सुरुवातीला दोषी मुकेश शर्माने राष्ट्रपतींकडे दया याचिका दाखल केली होती. त्यानंतर ती याचिकाही फेटाळण्यात आली होती. तर, दुसरा दोषी अक्षयनेही क्युरेटिव्ह पिटिशन दाखल केले होते. अक्षयचे पिटिशन फेटाळल्यानंतर आरोपी असलेला विनय शर्मानेही बुधवारी राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज केला आहे. विनय शर्माचे वकील एस. पी. सिंह यांनी ही माहिती दिली. त्यामुळे आता पुन्हा एकदा या दोषींची फाशीची शिक्षा लांबण्याची शक्यता आहे. या अर्जावर लवकरच निर्णय येण्याची शक्यता आहे. दरम्यान, बुधवारी सर्वोच्च न्यायालयाने चार पैकी एक दोषी असलेल्या मुकेश कुमार सिंह याच्या याचिकेचा फेरविचार किंवा त्यावर कोणताही निर्णय देण्यास नकार दिला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details