महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

राफेल प्रकरणी मोदी सरकारला 'सर्वोच्च' दणका; याचिकाकर्त्यांचे पुरावे ग्राह्य, पुन्हा होणार सुनावणी

राफेल फेरविचार याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. पुराव्यांबाबत सरकारने घेतलेले सर्व आक्षेप सर्वोच्च न्यायालयाने फेटाळले आहेत. शिवाय याचिकाकर्त्याने नव्याने न्यायालयात सादर केलेले पुरावे ग्राह्य धरले जातील असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे. हे पुरावे ग्राह्य धरू नये, असे केंद्र सरकारतर्फे न्यायालयात सांगण्यात आले होते. त्यांची ही विनंती फेटाळल्याने राफेल प्रकरणी मोदी सरकारला हा मोठा दणका सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.

नवी दिल्ली

By

Published : Apr 10, 2019, 11:05 AM IST

Updated : Apr 10, 2019, 12:13 PM IST

नवी दिल्ली- राफेल फेरविचार याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. पुराव्यांबाबत सरकारने घेतलेले सर्व आक्षेप सर्वोच्च न्यायालयाने फेटाळले आहेत. शिवाय याचिकाकर्त्याने नव्याने न्यायालयात सादर केलेले पुरावे ग्राह्य धरले जातील असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे. हे पुरावे ग्राह्य धरू नये, असे केंद्र सरकारतर्फे न्यायालयात सांगण्यात आले होते. त्यांची ही विनंती फेटाळल्याने राफेल प्रकरणी मोदी सरकारला हा मोठा दणका सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.

याप्रकरणाची सविस्तर सुनावणी नंतर होईल असे, न्यायालयाने सांगितले. राफेल प्रकरणी न्यायालयाने आमच्या याचिकेचा स्वीकार केला आहे आणि सरकारचा युक्तिवाद नाकारला आहे असे, याचिकाकर्ते अरुण शौरी यांनी सांगितले.

सर्वोच्च न्यायालयाने १४ डिसेंबरच्या सुनावणीत राफेल कराराविरोधातील सर्व याचिका फेटाळल्या होत्या. त्यामुळे केंद्र सरकारला मोठा दिलासा मिळाला होता. राफेल करारात कोणतीही अनियमितता नसून हा करार देशासाठी आवश्यक असल्याचे मत खंडपीठाने नमूद केले होते. यामुळे विरोधकांना मोठा झटका बसला होता. पण, आता लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर या निर्णयामुळे विरोध सरकारला कोंडीत पकडण्याची शक्यता आहे.

न्यायालयाच्या निर्णयानंतर काँग्रेस प्रवक्ते रणदीप सिंह सुरजेवाला यांनी ट्विट केले आहे. ते म्हणाले, मोदीजी आपण जितके पाहिजे तितके पळू शकता आणि खोटे बोलू शकता. पण लवकरच किंवा नंतर सत्य बाहेर येणारच आहे.

Last Updated : Apr 10, 2019, 12:13 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details