नवी दिल्ली -कोरोना महामारीचा प्रभाव असल्याने देशभरात २९ ऑगस्ट रोजी मोहरम मिरवणुकीस सर्वोच्च न्यायालयाने परवानगी नाकारली आहे. मुस्लिमांमधील शिया समाजाने मोहरम सणाच्या निमित्ताने मिरवणुकीची परवानगी मिळावी, म्हणून सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर सरन्यायाधीश एस.ए. बोबडे यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने निकाल दिला.
देशभरात मोहरम मिरवणुकीसाठी सर्वोच्च न्यायालयानं परवानगी नाकारली
मोहरम मिरवणुकीसाठी याचिकाकर्त्याने एका ठराविक ठिकाणासाठी परवानगी मागितली असती तर धोका आणि परिस्थिती लक्षात घेता, असा आदेश देऊ शकतो, असे सरन्यायाधीश बोबडे म्हणाले. मोहरम मिरवणुकीसाठी सामान्य आदेश दिल्याने गोंधळाची स्थिती निर्माण होईल, अन् एका ठराविक समुहाने कोरोनाचा प्रसार केल्याचे म्हणत लक्ष्य करण्यात येईल, असे सरन्यायाधीश म्हणाले.
राज्यांचे या मागणीवर काय मत आहे, हे जाणून घेतल्याशिवाय न्यायालय असा आदेश जारी करू शकत नाही, असे सरन्यायाधीशांनी याआधी झालेल्या सुनावणीत म्हटले होते. आज(गुरुवार) झालेल्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने ओडिशातील प्रसिद्ध जगन्नाथ पूरी रथयात्रेला दिलेल्या परवानगीपेक्षा वेगळे मत मांडले. जगन्नाथ पूरी रथ यात्रेसाठी फक्त एका ठराविक ठिकाणावर धार्मिक कार्यक्रम करण्यास परवानगी मिळावी, अशी मागणी याचिकाकर्त्याने केली होती. मात्र, मोहरम संबंधी याचिकाकर्त्याने सबंध देशामध्ये मोहरम मिरवणुकीस परवानगी मिळावी, अशी मागणी केली असल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले.
परवानगी फक्त एका ठराविक ठिकाणासाठी मागितली असती तर धोका आणि परिस्थिती लक्षात घेता, असा आदेश देऊ शकतो, असे सरन्यायाधीश बोबडे म्हणाले. मोहरम मिरवणुकीसाठी सामान्य आदेश दिल्याने गोंधळाची स्थिती निर्माण होईल, अन् एका ठराविक समुहाने कोरोनाचा प्रसार केल्याचे म्हणत लक्ष्य करण्यात येईल, असे सरन्यायाधीश म्हणाले.