महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

अयोध्येच्या 8 प्रमुख ठिकाणांवर ड्रोनची नजर

नुकतेच आयबीकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे नेपाळ सीमेकडून दहशतवादी आणि संशयास्पद व्यक्ती घुसखोरी करत असल्याची माहिती मिळाली आहे. त्यांच्याशी सामना करण्यासाठी ठिक-ठिकाणी सुरक्षा दलांनी अयोध्येला अभेद्य किल्ल्याचे स्वरूप दिले आहे.

अयोध्या

By

Published : Nov 8, 2019, 2:59 PM IST

अयोध्या - भगवान श्रीराम यांची नगरी अयोध्या येथे पंचकोशी (पाच कोसांची) परिक्रमा शेवटच्या टप्प्यात आहे. शिवाय, अनेक दशकांपासून सुरू असलेला अयोध्या जमीन विवाद प्रकरणाचा निर्णयही सर्वोच्च न्यायालयाकडून जाहीर होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत कोणत्याही प्रकारच्या घटनेशी दोन हात करण्यासाठी जिल्हा प्रशासन, पोलीस, गुप्तहेर संस्था सज्ज झाल्या आहेत.

नुकतेच आयबीकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे नेपाळ सीमेकडून दहशतवादी आणि संशयास्पद व्यक्ती घुसखोरी करत असल्याची माहिती मिळाली आहे. त्यांच्याशी सामना करण्यासाठी ठिक-ठिकाणी सुरक्षा दलांनी अयोध्येला अभेद्य किल्ल्याचे स्वरूप दिले आहे.

अयोध्येच्या 8 प्रमुख ठिकाणांवर ड्रोनने ठेवली जातेय नजर

अयोध्येमध्ये सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. सोशल मीडियावरही नजर ठेवण्यात येत आहे. संशयास्पद व्यक्तींची चौकशी केली जात आहे. जवळजवळ सर्वच ठिकाणी ड्रोनच्या माध्यमातून नजर ठेवण्यात येत आहे. अयोध्येत 8 ड्रोन कॅमेरे लावण्यात आले आहेत. त्यांची संख्या वाढवण्यात येऊ शकते.

ड्रोनच्या माध्यमातून छतावर दगड जमा करण्यांवरही नजर ठेवण्यात येत आहे. ही ड्रोन्स चालवण्यासाठी अनेक मंदिरे आणि मठांचीही मदत घेतली जात आहे. यामुळे ड्रोन उंचावरून उडवून अधिक प्रदेशावर देखरेख ठेवता येईल. संबंधित अधिकारी अरविंद चौरसिया यांनी ही माहिती दिली.

ABOUT THE AUTHOR

...view details