मेरठ - उत्तर प्रदेशातील मेरठ लोकसभा मतदारसंघात बहुजन समाज पक्षाकडून याकूब कुरेशी हे उमेदवार आहेत. कुरेशी यांचे कार्यकर्ते ईव्हीएममध्ये फेरफार होऊ नये याची काळजी घेत आहेत. यासाठी त्यांच्या कार्यकर्त्यांनी स्ट्राँगरुमसमोर ठाण मांडले आहे.
उत्तर प्रदेश : बसपाच्या कार्यकर्त्यांनी मेरठमधील स्ट्राँग रुमसमोर मांडला ठिय्या - yakoob qureshi
मेरठमध्ये बहुजन समाज पक्ष-समाजवादी पक्ष-राष्ट्रीय जनता दल युतीच्या कार्यकर्त्यांनी स्ट्राँगरुमसमोर ठाण मांडला आहे. ईव्हीएम मशीनमध्ये फेरफार होऊ नये याची दक्षता विरोधी पक्ष घेत आहे.
बसपाच्या कार्यकर्त्यांनी मेरठमधील स्ट्राँग रुमसमोर मांडला ठिय्या
देशभरात २३ मे रोजी मतमोजणी होणार आहे. यावेळी ईव्हीएम मशीनमध्ये फेरफार होऊ नये याची दक्षता विरोधी पक्ष घेत आहे. मेरठमध्ये बहुजन समाज पक्ष-समाजवादी पक्ष-राष्ट्रीय जनता दल युतीच्या कार्यकर्त्यांनी स्ट्राँगरुमसमोर ठाण मांडला आहे. एवढेच नव्हे तर दुर्बीणीद्वीरे ते मतमोजणी कक्षाच्या हालचालीकडे लक्ष देत आहेत.