धमतरी -स्त्रीची आई होण्याची इच्छा असणे ही सामान्य बाब आहे. मूल न झालेल्या महिलांनाही आई होण्याची संधी देण्यासाठी वैद्यकीय तंत्रज्ञानाने मोठी प्रगती केली आहे. मात्र, मूल होण्यासाठी या तंत्रज्ञानाचा आधार न घेता भलतेच उपाय केले जाण्याची संख्याही मोठी आहे. छत्तीसगडमधील धमतरी येथील अंगारमोती मंदिरातही अशीच थोतांड असलेली अघोरी परंपरा सुरू आहे. याविषयी ऐकल्यानंतर डोके सुन्न होईल.
छत्तीसगडमधील अंगारमोती मंदिरात अपत्यहीन महिला दिवाळीच्या आधीच्या शुक्रवारी मंदिरासमोर नारळ हातात घेऊन उभ्या असतात. येथील मंदिराच्या बैगाचा (पुजारी अथवा तत्सम व्यक्ती) पाय अंगावर पडल्यास मुले होता, असा अंधविश्वास येथील लोकांमध्ये आहे. यासाठी बैगा मंदिराकडे येत असताना या महिला मंदिरासमोर ओळीने रस्त्यात पालथ्या झोपतात. मंदिराचे अनेक बैगा आहेत. त्यांच्यावर अंगारमोती ही देवी बसलेली असते, असा समज आहे. हे बैगा या महिलांच्यावरून चालत मंदिरात येतात. यावर कहर म्हणजे येथील स्थानिक शिकलेले लोक आणि चक्क डॉक्टरसुद्धा या अघोरी प्रकारामुळे त्या महिलांना मुले होतात, असे सांगत आहेत.
गंगरेल धरणाच्या तीरावर अंगारमोती मंदिराची स्थापना