नवी दिल्ली -ज्येष्ठ अभिनेते आणि भाजपचे खासदार सनी देओल हरियाणामध्ये भाजपाचा प्रचार करत आहेत. यावेळी त्यांनी दामिनी चित्रपटातील डॉयलॉग म्हणत लोकांना भाजपला मतदान करण्याचे आवाहन केले आहे.
'२१ तारिक को याद रखना, कमल फूल का बटन दबाना है',सनी देओलचा हरियाणामध्ये फिल्मी स्टाईलने प्रचार - कमल फूल का बटन दबाना है
ज्येष्ठ अभिनेते आणि भाजपचे खासदार सनी देओल हरियाणामध्ये भाजपाचा प्रचार करत आहेत.
पंजाबमधील गुरुदासपूरचे खासदार सनी देओल यांनी फिल्मी स्टाईलमध्ये पक्षाचा प्रचार केला आहे. सभेला संबोधीत करताना त्यांनी 'तारीक पे तारिक, तारी पे तारीक, पर २१ तारिक को याद रखना, कमल फूल का बटन दबाना है, नहीं तो तू २ किलो का हाथ पडता है तो क्या होता है?' दामिनी चित्रपटातील डॉयलॉग म्हटला.
हरियाणामध्ये 21 ऑक्टोबर रोजी मतदान होत असून शनिवारी निवडणूक प्रचार संपुष्टात येणार आहे. अशा परिस्थितीत भाजपकडून प्रचारामध्ये संपूर्ण शक्ती लावली जात आहे. भाजपचे स्टार प्रचारक गेल्या काही दिवसांपासून राज्यात सतत प्रचार करत आहेत.