नवी दिल्ली - सुशांतसिंह राजपूत आत्महत्येचं गूढ दिवसेंदिवस वाढत आहे. याप्रकरणी बॉलीवूडमधील अनेक दिग्गजांवर आरोपही करण्यात आले. तसेच याचा संबंध राजकारणाशी जोडण्यात येतोय. त्यातच आता सुब्रमण्यम स्वामी यांच्या ट्विटची भर पडली आहे. ‘मला असं का वाटतंय सुशांतची हत्या करण्यात आली आहे’, असं ट्विट त्यांनी केले आहे.
सुशांतसिंह आत्महत्या प्रकरणी सुब्रमण्यम स्वामींचे ट्विट, पाहा काय म्हणाले... - सुशांतसिंह राजपूत मृत्यूप्रकरण अपडेट
सुशांतने त्याच्या वांद्रे येथील राहत्या घरी आत्महत्या केली होती. त्यानंतर शवविच्छेदन अहवालातून त्याने आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले होते. मात्र, त्याचे वडील के. के. सिंह यांनी पाटणा येथे सुशांतची मैत्रिण रिया चक्रवर्तीविरोधात तक्रार दाखल केली होती.
सुशांतसिंह आत्महत्या प्रकरणी सुब्रमण्यम स्वामींचे ट्विट
सुशांतने त्याच्या वांद्रे येथील राहत्या घरी आत्महत्या केली होती. त्यानंतर शवविच्छेदन अहवालातून त्याने आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले होते. मात्र, त्याचे वडील के. के. सिंह यांनी पाटणा येथे सुशांतची मैत्रिण रिया चक्रवर्तीविरोधात तक्रार दाखल केली होती. तसेच याप्रकरणी सीबीआय चौकशीची मागणीदेखील जोर धरत होती. सर्वोच्च न्यायालयाने याप्रकरणी सीबीआय चौकशीचे आदेश दिले. त्यानुसार चौकशी सुरू आहे. या प्रकरणात आतापर्यंत अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत.