अयोध्या -राज्यसभेचे खासदार डॉ. सुब्रमण्यम स्वामी शनिवारी २ दिवसीय दौऱ्यासाठी अयोध्येला पोहोचले. सुब्रमण्यम स्वामी यांनी केंद्रीय मंत्री अमित शाह यांचे त्यांनी ज्या पद्धतीने आर्टिकल 370 हटवले, त्यासाठी कौतुक केले. 'अमित शाह यांनी राज्यसभेत बहुमत नसतानाही एक तृतीयांश मते मिळवली. असे यश मिळवणे हे त्यांच्या यशस्वी धोरणांचे फलित आहे,' असे ते म्हणाले.
पी. चिदंबरम यांच्याविषयी प्रश्न विचारला असता, सुब्रमण्यम स्वामी यांनी 'चिदंबरम यांनी चुकीचे काम केल्यामुळेच ते तुरुंगात असल्याचे' सांगितले. 'चिदंबरम यांनी हिंदूंना ललकारले होते. त्यांनी हिंदू दहशतवाद देशासाठी धोका निर्माण करत असल्याचे म्हटले होते. आज ते तुरुंगात आहे. चुकीची कामे हिंदूंनी तेली नव्हती. तर, ती चिदंबरम यांनी केली होती. आता सोनिया गांधी आणि शशी थरूरही शर्यतीत आहेत. लवकरच ते चिदंबरम यांना कंपनी देण्यासाठी तुरुंगात जातील,' असे स्वामी म्हणाले.