महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

महात्मा गांधी हत्येचा खटला पुन्हा सुरू करावा - सुब्रमण्यम स्वामी - subramanian swamy in shimla himanchal pradesh

'गांधीजींच्या हत्येच्या चौकशीत आणि खटल्यात मी अशा १६ त्रुटी शोधून काढल्या आहेत, ज्यांची उत्तरे मिळणे आवश्यक आहे. यासाठी गांधीजींच्या हत्या प्रकरणाची पुन्हा चौकशी सुरू केली पाहिजे,' असे सुब्रमण्यम स्वामी म्हणाले.

सुब्रमण्यम स्वामी

By

Published : Oct 20, 2019, 12:50 PM IST

Updated : Oct 20, 2019, 1:05 PM IST

शिमला -भाजप नेते आणि राज्यसभेचे सदस्य सुब्रमण्यम स्वामी यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधीजींच्या हत्येचा खटला पुन्हा सुरू करावा, असे म्हटले आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना एका प्रश्नाचे उत्तर देताना स्वामींनी हे मत व्यक्त केले. गांधीजींच्या हत्या प्रकरणात अनेक बाबींची स्पष्टता झालेली नाही. यासाठी हा खटला पुन्हा सुरू करावा, असे स्वामी म्हणाले. ते हिमाचल प्रदेशातील शिमला येथे पत्रकार परिषदेत बोलत होते.

'महात्मा गांधीजींची हत्या झाली, यात कोणताही संशय नाही. मात्र, या प्रकरणात अनेक प्रश्न अनुत्तरित राहिले आहेत,' असे सुब्रमण्यम स्वामी म्हणाले.

पहिला प्रश्न - या घटनेनंतर तिथे उपस्थित असलेल्या कोणी एफआयआर का दाखल केली नाही? तेथे पोलीसही उपस्थित होते. कॅनॉट प्लेस येथील एका हॉटेल चालकाने तुघलक रोड पोलीस ठाण्यात जाऊन एफआयआर दाखल केली. याचे कारण काय, असा सवाल त्यांनी केला.

दुसरा प्रश्न - गांधीजींना गोळी लागल्यानंतर लगेच त्यांचे प्राण गेले नव्हते. ते जिवंत होते. गोळी लागल्यानंतर त्यांना त्यांना बिर्ला हाउसमध्ये जमिनीवर झोपवण्यात आले होते. यादरम्यान ते 40 मिनिटांपर्यंत जिवंत होते. यादरम्यान गांधीजींनी पाणीही मागितले होते.

आता प्रश्न असा निर्माण होतो की, गांधीजींना गोळी लागल्यानंतर लगेच रुग्णालयात का नेण्यात आले नाही? या बाबीचा आतापर्यंत कोणताही खुलासा झालेला नाही. बिर्ला हाऊसपासून रुग्णालय केवळ 10 मिनिटांच्या अंतरावर होते. या रुग्णालयाचे जुने नाव विलिंग्डन हॉस्पिटल होते आणि नवे नाव डॉ. राम मनोहर लोहिया हॉस्पिटल आहे. गांधीजींवर लगेच उपचार का झाले नाहीत, याचा खुलासा झालेला नाही, असा मुद्दा स्वामींनी मांडला.

तिसरा प्रश्न - जेव्हा न्यायालयात आरोपपत्र दाखल झाले, तेव्हा त्यामध्ये ३ गोळ्या झाडण्यात आल्या होत्या, असे म्हटले होते. ज्या तीन गोळ्या होत्या, त्यांना गोडसेजवळी रिव्हॉल्व्हरमधील गोळ्यांशी 'मॅच' होतात की नाहीत, याचा तपास करण्यात आला नाही. 'माझ्या माहितीप्रमाणे मी दोन गोळ्या झाडल्या,' असे गोडसेने आपल्या जबाबात म्हटले होते. तेव्हा, तीनही गोळ्या गोडसेच्याच रिव्हॉल्वरमधून झाडल्या गेल्या होत्या का, याचा खुलासा झालेला नाही, असे स्वामी म्हणाले.

चौथा प्रश्न - जेव्हा एखाद्याची हत्या होते, तेव्हा त्याच्या मृतदेहाची उत्तरीय तपासणी केली जाते. मात्र, गांधीजींच्या मृतदेहाची उत्तरीय तपासणी झाली नाही, ही गंभीर बाब असल्याचे स्वामी म्हणाले.

'गांधीजींच्या हत्येच्या चौकशीत आणि खटल्यात मी अशा १६ त्रुटी शोधून काढल्या आहेत, ज्यांची उत्तरे मिळणे आवश्यक आहे. यासाठी गांधीजींच्या हत्या प्रकरणाची पुन्हा चौकशी सुरू केली पाहिजे,' असे सुब्रमण्यम स्वामी म्हणाले.

इतकेच नाही, सुब्रमण्यम स्वामींनी गांधीजींच्या हत्येचा सर्वाधिक फायदा जवाहरलाल नेहरूंना झाला, असेही म्हटले. 'गांधीजींच्या हत्येनंतर नेहरू सर्वेसर्वा बनले. त्यांना पटेलांनाही संशयितांमध्ये टाकले. आरएसएसवर बंदी घातली. स्वतःला एका नव्या सेक्युलर रुपात (धर्मनिरपेक्ष) प्रस्तुत करण्यासाठी जवाहरलाल नेहरूंनी असे केले,' असा आरोप स्वामींनी केला.

'मी असे म्हणत नाही की, माझा जवाहरलाल नेहरूंवर संशय आहे. मात्र, सर्वसामान्यपणे गुन्ह्याचा शोध घेताना ज्यांना त्यामुळे फायदा झाला आहे, त्यांची आधी चौकशी केली जाते,' असा मुद्दा त्यांनी उपस्थित केला.

'जेव्हा गोडसेने समोर येऊन गांधीजींना गोळी घातली, तेव्हा गांधीजी मनू आणि आभा या दोन मुलींसह गांधीजी प्रार्थना सभेकडे येत होते. या दोघी जणी गांधी हत्या स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलेल्या साक्षीदार होत्या. मात्र, न्यायालयात या दोघींना साक्षीदार बनवण्यात आले नाही. का? त्यांना कोणी अडवले?' असा प्रश्न स्वामींनी उपस्थित केला. तसेच, 'या मुलींची त्यांच्या आयुष्यात कधीही या घटनेसंबंधात चौकशी झाली नाही. त्यांना जाणीवपूर्वक साक्षीदार बनवले गेले नसावे,' अशी शंकाही त्यांनी व्यक्त केली.

'जेव्हा गांधीजींची हत्या झाली, तेव्हा त्यांनी काँग्रेसचे विभाजन करून दोन पक्ष बनवण्याचे ठवरले होते. एकाचे नेतृत्व सरदार पटेलांकडे द्यावे आणि दुसऱ्याचे नेतृत्व जवाहरलाल नेहरूंकडे द्यावे, असे ठरवले होते. प्रार्थना सभेला जाण्यापूर्वी याविषयी गांधीजी आणि सरदार पटेल यांच्यामध्ये चर्चा होऊन हा निर्णय झाला होता. हे सर्व गांधीजींचे खासगी सचिव प्यारे लाल यांनी त्यांच्या 'लास्ट विल एंड टेस्टामेंट' या पुस्तकात लिहिले आहे. या सर्व बाबींची कधीही चौकशी झाली नाही. गोडसेने गांधीजींवर गोळी झाडली, यात कोणाचेही दुमत नाही. तरीही, या प्रकरणी पुन्हा चौकशी करणे आवश्यक आहे,' असे स्वामी म्हणाले.

Last Updated : Oct 20, 2019, 1:05 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details