महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

भारताने घेतली पाणबुडीवरून डागलेल्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी

जागतिक अण्वस्त्र गटात भारताने अलिकडेच प्रवेश केला आहे. के-4ला तांत्रिक आणि डावपेचात्मक दृष्टीने काही ऐतिहासिक संदर्भात तपासून पाहणे उपयुक्त ठरेल. अमेरिका आणि रशिया यांनी (पूर्वीच्या सोव्हिएत परंपरा आणि डावपेचात्मक संपत्ती) त्यांचे स्वतःचे एसएलबीएम या पूर्वीच विकसित केले आहेत.

के-4
के-4

By

Published : Jan 26, 2020, 7:23 PM IST

भारताने रविवारी(१९जानेवारी) के-4 सबमरीन लॉन्च बॅलेस्टिक मिसाईल (एसएलबीएम) या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली. ३ हजार ५०० किलोमीटर लांबीची त्याची मारकक्षमता आहे. हे क्षेपणास्त्र आंध्रच्या किनाऱ्यावरील तात्पुरत्या पुलावरील पाणबुडीतून डागण्यात आले. चाचणीच्या वेळेस सर्व तांत्रिक निकषांचे समाधानकारक पालन केले गेले, असे वृत्त आहे. सरकारकडून याबाबत अधिकृत निवेदन काढण्यात आलेले नाही. मात्र, के-4च्या यशस्वी चाचणीला सरकारी सूत्रांनी दुजोरा दिला. वर्तुळाकार त्रुटी संभावना म्हणजेच सीईपी हे चीनी क्षेपणास्त्रांपेक्षा खूपच अद्ययावत होते, असेही त्यांनी पुढे सांगितले.

के -4 एसएलबीएम विकसित करण्यात भाग घेतलेल्या संरक्षण संशोधन आणि विकास संघटना म्हणजे डीआरडीओ आणि इतर संस्थांची प्रशंसा केली पाहिजे. मात्र, त्याचवेळी के-4ची कार्यक्षमता आणि पाण्याखालील भारताचे आण्विक प्रतिबंधक सामर्थ्याबाबत अतिशयोक्त दावे करणे शहाणपणाचे ठरणार नाही.

हेही वाचा - नो टू सिंगल यूज प्लास्टिक: घरोघरी जाऊन प्लास्टिक कचरा जमा करतोय इलेक्ट्र्रिकल इंजीनिअर

जागतिक अण्वस्त्र गटात भारताने अलीकडेच प्रवेश केला आहे. के-4ला तांत्रिक आणि डावपेचात्मक दृष्टीने काही ऐतिहासिक संदर्भात तपासून पाहणे उपयुक्त ठरेल. अमेरिका आणि रशिया यांनी (पूर्वीच्या सोव्हिएत परंपरा आणि डावपेचात्मक संपत्ती) त्यांचे स्वतःचे एसएलबीएम या पूर्वीच विकसित केले आहेत.

शीतयुद्ध जेव्हा शिखरावर होते, तेव्हा ८०च्या दशकाच्या मध्यात, या दोन देशांनी एसएलबीएम क्षेपणास्त्रे एसएसबीएन (आण्विक शक्तीवरील बॅलिस्टिक क्षेपणास्त्र वाहून नेणारी पाणबुडी) अभेद्य पाणबुडीवरती गुपचूप तैनात केली होती. या क्षेपणास्त्रांचा पल्ला १२ हजार किलोमीटरचा होता. तर सीईपी शंभर मीटरच्या आत होती.

इंग्लंड आणि फ्रान्स या मध्यम स्वरूपाच्या अण्वस्त्रधारी सत्ता मानल्या जातात. पाण्याखालील प्रतिबंधक सामर्थ्यासंदर्भात ते अमेरिका प्रणित सामरिक संरचनेचा भाग आहेत. चीनने ऑक्टोबर १९६४ मध्येच आपली अण्वस्त्र क्षमता जाहीर केली होती. १९८२ मध्ये चीनने एसएलबीएमची पहिली चाचणी घेतली. त्या क्षेपणास्त्राला जे एल -१ असे म्हटले जायचे. त्याचा पल्ला त्यावेळी अगदीच माफक म्हणजे १ हजार ७०० किलोमीटरचा होता.

मधल्या काही दशकांत, चीनने आपल्या पाणबुडी क्षमतेत तसेच पाण्याखालील प्रतिबंधक सामर्थ्यात लक्षणीय प्रमाणात गुंतवणूक केली. नोव्हेंबर २०१८ मध्ये, चीनने जेएल-३ ची चाचणी घेतली. त्याचा पल्ला ९ हजार किलोमीटर होता. लवकरात लवकर हे क्षेपणास्त्र जहाजावर (एसएसबीएन) ठेवले जाईल आणि २०२५ मध्ये पूर्णपणे कार्यान्वित होईल, असे मानले जात आहे.

या व्यापक प्रादेशिक आणि जागतिक संदर्भात पाण्याखालील प्रतिबंधक सामर्थ्य वाढवण्याच्या भारताच्या ताज्या प्रयत्नांकडे पाहिले पाहिजे. २०२०-२०१८ मध्ये पाण्याखालील डावपेचात्मक सुरक्षेच्या क्षेत्रात भारताने प्रवेश केला, याचे येथे स्मरण केले पाहिजे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका ट्विटद्वारे भारताच्या या क्षेत्रातील आगमनाची घोषणा केली होती. मोदी यांनी त्यात म्हटले होते की, भारताचा अभिमान, असलेली आण्विक पाणबुडी आयएनएस अरिहंतने पहिली प्रतिंबधात्मक गस्त यशस्वीपणे पूर्ण केली. भारताने माफक का होईना, पण पाण्याखालील विश्वासार्ह प्रतिबंधक क्षमता प्राप्त केली आहे, याची ती पहिली अधिकृत पोचपावती होती.

'माफक' हा शब्द येथे चुकीचा म्हणता येणार नाही. अरिहंत ज्या क्षेपणास्त्राने सुसज्ज होते, त्याचा पल्ला साडेसातशे किलोमीटरचा होता. एसएसबीएनच्या मालिकेतील पुढील पाणबुडीला यापेक्षा अधिक लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची गरज राहिल, हे स्पष्ट होते. ही तफावत भरून काढण्याचा के-4चा प्रयत्न आहे.

माजी नौदल प्रमुख आणि चीफ ऑफ स्टाफ कमिटीचे अध्यक्ष अ‌ॅडमिरल अरुण प्रकाश यांनी अरिहंतने पहिली गस्त पूर्ण केल्यावर खालील गोष्टींकडे दिशानिर्देश केला होता. आण्विक त्रिकुटाच्या तिसऱया चरणात, एसएसबीएन शत्रूला अण्वस्त्र वाहून नेणाऱ्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांनी प्रत्युत्तर देण्याची हमी देते. त्याचा उर्वरित भाग पाण्याखालीच राहत असल्याने ते अभेद्य आहे. यामुळे देशाच्या आण्विक प्रतिबंधक सामर्थ्याबाबत मोठी विश्वासार्हता प्राप्त झाली आहे. तरीसुद्धा, भारतीय एसएसबीएन पाणबुड्यांना आंतरउपखंडीय पल्ला असलेल्या क्षेपणास्त्रांची गरज आहे. त्यामुळे ते अरबी समुद्र किंवा बंगालच्या उपसागरातील आपल्या सुरक्षित क्षेत्रात राहून शत्रूच्या सैन्याला विश्वासार्हतेने प्रतिरोध करू शकतील.

३ हजार ५०० किलोमीटरच्या पल्ल्यासह, के-4ची १९ जानेवारीची चाचणी त्या दिशेने लहान तरीही महत्त्वपूर्ण पाऊल आहे. जगातील कोणत्याही लष्करासाठी पाणबुडीतून बॅलिस्टीक क्षेपणास्त्र डागणे हे सर्वाधिक आव्हानात्मक काम आहे, हे लक्षात घेणे योग्य ठरेल. जमिनीवरून डागल्या गेलेल्या बॅलिस्टीक क्षेपणास्त्राचा मार्ग दोन क्षेत्रातून जातो. पृथ्वीचे वातावरण आणि बाह्य अंतराळात प्रवास करत ते जाते. एसएलबीएमला वेगवेगळी वैशिष्ट्य असलेल्या तीन क्षेत्रातून प्रवास करावा लागतो.

पाण्याखालून बॅलिस्टिक क्षेपणास्त्र डागले जाते, तेव्हा त्याला प्रथम पाणी हे माध्यम ओलांडून जावे लागते. त्यानंतर पृथ्वीच्या वातावरणातून ते पॅराबोलिक मार्गाने म्हणजे यू आकाराने प्रवास करून बाह्य अंतराळात प्रवेश करते. त्यानंतर हजारो किलोमीटर सरळ रेषेत जाऊन पुन्हा अंतिम लक्ष्यावर मारा करताना पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करते.

ही अत्यंत गुंतागुंतीची अचाट तांत्रिक कामगिरी आहे. अवजड क्षेपणास्त्र डागल्यानंतर त्याचा परिणाम पाणबुडीच्या स्थिरतेवर होणार नाही, यासाठी अनेक निकषांमध्ये ताळमेळ साधावा लागतो. १९ जानेवारीची के-4 ची चाचणी ही नावांच्या तात्पुरत्या पुलावरून सोडून करण्यात आली आहे. पण पुढील टप्प्यात क्षेपणास्त्राची चाचणी अरिहंत श्रेणीतील दुसऱ्या जहाजातून करण्यात येईल, अशी अपेक्षा आहे. इतर देशांचा अनुभव पाहिला तर, योग्य पल्ल्याचे एसएलबीएम सोडण्यासाठीची क्षमता प्राप्त करण्यासाठी आणखी काही वर्षे लागतील.

तोपर्यंत भारताचे पाण्याखालील प्रतिबंधात्मक सामर्थ्य वाढवण्याचे काम प्रगतीपथावर आहे, असे नमूद करता येईल. आवश्यक त्या प्रमाणात विश्वासार्हता गाठण्यासाठी पुरेशी राष्ट्रीय इच्छाशक्ती आणि वित्तीय स्त्रोत पुरवावे लागतील.
- सी उदय भास्कर

ABOUT THE AUTHOR

...view details