नवी दिल्ली - ईशान्येकडील राज्यांमध्ये अनेक विद्यार्थी फॅशन डिझायनिंग अभ्यासक्रमांच्या माध्यमातून भारताला फॅशनेबल देशांच्या यादीत अव्वल स्थान मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत आहेत. या राज्यांमधील तरुणांकडे फॅशन सेन्स आहे. बरेच तरुण आता हीच फॅशन व्यवसाय म्हणून निवडत आहेत.
ईशान्येकडील तरुणांमध्ये विशेषत: स्त्रियांमध्ये फॅशन कल्चरची वेगळीच आवड आहे. त्यांचे राहणीमान त्यांची या क्षेत्राबद्दल असलेली आवड आणि कल दर्शवते. त्यामुळे अनेकजण आता फॅशन उद्योगाला फलदायी करिअरच्या दृष्टीने पाहत आहेत. विद्यार्थ्यांमध्ये फॅशन डिझायनिंग अभ्यासक्रमांची निवड करण्याचे प्रमाण वाढले आहे. मेघालयमध्ये बर्याच शैक्षणिक संस्थांनी प्राथमिक शिक्षण स्तरावरच फॅशन डिझायनिंगचे धडे देणारे कोर्सही चालू केले आहेत.
शिलाँगमधील बीके बाजोरिया शाळेच्या मुख्याध्यापिका वंदना गुप्ता याविषयी बोलताना म्हणतात, "सीबीएसईचा अभ्यसक्रम फॅशन स्टडी हा विषय विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देतो. हा विषयदेखील शाळेत गणित, विज्ञान यांसारख्या विषयांप्रमाणेच शिकवला जाते" हा एक व्यावसायिक विषय आहे जो व्यावहारिक आणि सैद्धांतिक ज्ञानाने शिकवला जातो. अर्थपूर्ण विषय असल्याने विद्यार्थ्यांना पुढे फॅशन डिझायनिंगमध्ये करिअर घडविण्यासाठी याची मदत होईल, असे मतही त्या मांडतात.
हेही वाचा -भारतात विद्युत वाहनांचा प्रवेश आणि त्याची आव्हाने
उच्च माध्यमिक शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मोठ्या संख्येने विद्यार्थी फॅशन डिझायनिंग अभ्यासक्रम निवडतात. तिथे त्यांना शिवणकाम, विविध आर्ट फॉर्म, आकृतिबद्ध डिझाइन करणे आणि शेवटी एक उत्तम फॅशनेबल पेहराव तयार करण्याचे प्रशिक्षण दिले जाते. मात्र, प्राथमिक स्तरावर औद्योगिक अभ्यासक्रम शिकवणाऱ्या शैक्षणिक संस्था फॅशन जगातात आपली झलक दाखवू इच्छिणाऱ्या प्रतिभावंत विद्यार्थ्यांना मार्ग खुला करून देत आहेत.