बस्तर (छत्तीसगड) - नक्षलवाद, आदिवासी आणि नैसर्गिक सौंदर्य या तिन्ही गोष्टींचा उल्लेख केल्यानंतर तुम्हांला हे समजायला हवे की तुम्ही आता बस्तर येथे पोहोचला आहात. राज्यातील दक्षिण भागात हा परिसर आहे. ज्याठिकाणी 70 टक्के जनता आदिवासी आहे. येथील मोठ्या प्रमाणात असलेली आदिवासी जनता जंगलात वास्तव्य करते. त्यांची असलेली वेगळी संस्कृती, कला, आणि सणांच्या माध्यमातून त्यांची वेगळी ओळख आहे. बस्तर... जिथे सुविधा मिळणे खुप कठीण आहे. विशेष म्हणजे कोरोनाच्या काळात ऑनलाइन शिक्षणाचे यश त्यांच्यासाठी स्वप्नापेक्षा कमी नाही. विश्वास बसेल नसेल ना? वाचा, येथील विद्यार्थी काय म्हणतायेत...
याठिकाणी नेटवर्कही नाही आणि विद्यार्थ्यांकडे स्मार्टफोनही नाही. इतकेच नव्हे तर मोबाईल फोनमध्ये रिचार्ज करण्यासाठी पैसेदेखील नाहीत. येथील परिस्थिती अशी आहे की, 3 जुलैला संपूर्ण विभागातून केवळ 17 विद्यार्थी ऑनलाईन शिक्षणासाठी हजर होती. यानंतर उर्वरित दिवसांमध्ये हा आकडा 30 च्या वरही ओलांडला नाही. इतकेच नाही तर ऑनलाईन शिक्षणासाठी नोंदणीची टक्केवारीही गाठली गेली नाही.
बस्तर विभागातील साक्षरता प्रमाण 51.5 टक्के आहे. सुकमा जिल्ह्यातील साक्षरता दर 44 टक्के आहे. जो फक्त राज्यातच नाही तर संपूर्ण देशात कमी आहे. तर दुसरीकडे कंकर जिल्ह्यातील साक्षरता दर 68 टक्के आहे. जो विभागातील सर्वात जास्त साक्षरता दर आहे. इतकेच नाही तर विभागात 7 हजार शिक्षकांची पदे रिक्त आहेत. ऑनलाईन शिक्षणाचा लाभ मिळत नाही आहे, अशी प्रतिक्रिया येथील विद्यार्थ्यांनी दिली. ज्या विद्यार्थ्यांकडे मोबाईल आहेत त्यांच्याकडे इंटरनेट सर्व्हिसच्या रिचार्जसाठी पैसेही नाहीत. तर काही ठिकाणी गरीब लोकांना दुसऱ्यांचा मोबाईल घेऊन अभ्सास करायला भाग पडत आहे.
हेही वाचा -ना फोन ना इंटरनेट... ऑनलाईन अभ्यास करायचा तरी कसा?