महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

बिहार विधानसभा निवडणूक : कन्हैया कुमार करणार 'या' पक्षाचा प्रचार - बिहार विधानसभा निवडणूक अपडेट

भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या स्टार प्रचारकांमध्ये कन्हैया कुमार, जेएनयूचे विद्यमान अध्यक्षा आयेशा घोष, माजी अध्यक्ष आशुतोष कुमार यांच्यासह 30 जणांचा समावेश आहे. भारतीय कम्युनिस्ट पक्षाने काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दलाशी महागठबंधन केले आहे.

कन्हैया कुमार
कन्हैया कुमार

By

Published : Oct 10, 2020, 8:14 PM IST

नवी दिल्ली -बिहार विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यापासून सर्वच राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. काँग्रेसकडून आपल्या स्टार प्रचारकांची यादी निवडणूक आयोगाला सोपवण्यातआली आहे. तर भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या स्टार प्रचारकांमध्ये कन्हैया कुमार, जेएनयूचे विद्यमान अध्यक्षा आयेशा घोष, माजी अध्यक्ष आशुतोष कुमार यांच्यासह 30 जणांचा समावेश आहे.

कन्हैया कुमार हे राष्ट्रीय स्तरावरील नेता आहेत. त्यांनी 2019 च्या लोकसभा निवडणुकांत बेगुसरायमधून निवडणूक लढवली होती. मात्र, त्यांचा पराभव झाला होता. आता बिहार विधानसभा निवडणुकीमध्ये कन्हैया कुमार भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा प्रचार करतील. भारतीय कम्युनिस्ट पक्षाने काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दलाशी महागठबंधन केले आहे. राष्ट्रीय जनता दल 144, काँग्रेस 70 आणि डावे पक्ष 29 जागांवर लढणार आहेत.

बिहार विधानसभेची निवडणूक 28 ऑक्टोबर, 3 आणि 7 नोव्हेंबर अशा तीन टप्प्यांमध्ये होणार असून 10 नोव्हेंबर रोजी निकाल घोषित केला जाईल. कोरोना संकटकाळात देशात होणारी ही पहिली निवडणूक आहे. 2015 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने 27 जागा जिंकल्या होत्या. तर 80 जागा मिळवून आरजेडी सर्वात मोठा पक्ष ठरला होता.

ABOUT THE AUTHOR

...view details