कोलकाता - पश्चिम बंगालमध्ये राजकीय हत्यांच्या पार्श्वभूमीवर भाजप कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. भाजप कार्यकर्ते या हत्यांसाठी राज्य सरकारचा निषेध करत बिपीन बिहारी गांगुली मार्गावरून लाल बाजारच्या दिशेने निघाले होते. आक्रमक झालेल्या भाजपा कार्यकर्त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीमार करत अश्रुधारांच्या नळकांड्या फोडल्या शिवाय पाण्याचे फवारे देखील सोडले.
पश्चिम बंगालमध्ये संघर्ष टोकाला, कोलकात्यात भाजपच्या मोर्चावर पोलिसांचा लाठीमार - tmc
भाजपने लोकसभा निवडणुकीत बंगालमध्ये १८ जागा जिंकत तृणमूल काँग्रेसची मक्तेदारी मोडीत काढण्यास सुरुवात केली आहे. त्यांनी तृणमूलला २२ जागांवर रोखण्यात यश मिळवले आहे. या ममतांसाठी मोठा धक्का ठरला आहे. तसेच, डावे पक्षही मर्यादित संख्येतच आहेत.
पोलिसांच्या कारवाईनंतर भाजप कार्यकर्त्यांनी भाजपचा झेंडा घेऊन ‘जय श्रीराम’ ही घोषणा देत ममता सरकारचा तीव्र निषेध करण्यास सुरुवात केली. यामुळे येथील परिस्थिती अधिकच चिघळताना दिसत आहे.
'ममता बॅनर्जींमुळे पश्चिम बंगालमध्ये हिंसा होत आहे. त्यांच्या बेजबाबदार वक्तव्यांमुळे हे घडत आहे. भाजप देशभरात आहे. तिथे हिंसेचे प्रकार घडत नाहीत. बंगाल व्यतिरिक्त कोणत्याही ठिकाणी हिंसेच्या घटना पहायला मिळत नाहीत. असे का?' असा सवाल भाजपचे सचिव कैलाश विजयवर्गीय यांनी केला आहे. 'बंगाल हिंसेमध्ये होरपळत आहे. ममता बॅनर्जींनी गुजरातमध्ये जाऊन तिथल्या सुधारणा पहाव्यात. आम्ही बंगाल गुजरातपेक्षाही चांगला करू. पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी हा निश्चय केला आहे,' असे ते म्हणाले.
भाजपने लोकसभा निवडणुकीत बंगालमध्ये १८ जागा जिंकत तृणमूल काँग्रेसची मक्तेदारी मोडीत काढण्यास सुरुवात केली आहे. त्यांनी तृणमूलला २२ जागांवर रोखण्यात यश मिळवले आहे. या ममतांसाठी मोठा धक्का ठरला आहे. तसेच, डावे पक्षही मर्यादित संख्येतच आहेत.