लखनौ –यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी स्थलांरित मजुरांनी पायी, दुचाकीवरून व जीव धोक्यात घालून अन्य असुरक्षित वाहनांतून प्रवास न करण्याचे आवाहन केले आहे. आदित्यानाथ यांनी सरकारी वाहनांनी स्थलांतरितांना सुरक्षितपणे त्यांच्या घरापर्यंत पोहोचविण्याचे आश्वासन दिले आहे. त्यांनी म्हटले की, मजुरांच्या प्रवासासाठी प्रशासन युद्धस्तरावर प्रयत्न करत आहे. राज्य सरकार स्थलांतरित मजुरांना रेल्वेच्या माध्यामातून मोफत प्रवासाची संधी देत आहे.
औरैया अपघातानंतर मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांवर नाराजी व्यक्त केली आहे. आपल्या सरकारी निवासस्थानी आयोजित समीक्षा बैठकीत योगींनी प्रशासनाला आदेश दिले, की राज्याच्या सीमेवरून कोणीही स्थलांतरित मजूर पायी किंवा धोकादायक रित्या प्रवास करून येऊ नये. असे आढळल्यास संबंधित वाहन जप्त करण्याचचे आदेश दिले आहेत. पायी प्रवास करणाऱ्यांना पोलिसांनी अडविले पाहिजे.
मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले, की राज्यात दाखल होणाऱ्या स्थलांतरित मजुरांसाठी भोजन व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी. त्यानंतर त्यांची वैद्यकीय तपासणी करावी. मजुरांनी सुरक्षित व सन्मानपूर्वत त्यांच्या घरांपर्यंत पोहोचविले पाहिजे. सीमेवरील प्रत्येक जिल्ह्यात २०० बसेस तैनात करण्याबरोबरच त्यासाठी निधीची तरतूदही करण्यात आली आहे.