नवी दिल्ली - भारतामध्ये तीन आठवड्यांची संचारबंदी लागू केल्यानंतर अनेक परदेशी पर्यटक भारतात अडकून पडले आहेत. त्यांच्या मदतीसाठी केंद्रीय पर्यटन मंत्रालयाने पोर्टल सुरू केले आहे. 'स्ट्रॅनडेड इन इंडिया' म्हणजेच 'भारतात अडकलेले' असे या पोर्टलचे नाव ठेवण्यात आले आहे.
भारतात अडकलेल्या परदेशी पर्यटकांच्या मदतीसाठी केंद्र सरकारचे पोर्टल - संचारबंदी भारत
परदेशी पर्यटकांना भारत सरकारद्वारे कोणकोणत्या सुविधा देण्यात येत आहेत, याची माहिती या पोर्टलवर असणार आहे.
![भारतात अडकलेल्या परदेशी पर्यटकांच्या मदतीसाठी केंद्र सरकारचे पोर्टल स्ट्रॅनडेड इन इंडिया](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-6608508-thumbnail-3x2-pravin.jpg)
स्ट्रॅनडेड इन इंडिया
परेदशी पर्यटकांना भारत सरकारद्वारे कोणकोणत्या सुविधा देण्यात येत आहे, याची माहिती यावर असणार आहे. परदेशी पर्यटकांना एकाच ठिकाणी त्यांच्या सुविधेसाठी माहिती मिळणार आहे. तसेच परदेशी पर्यटकासंबधी घेण्यात येणारे निर्णयही या पोर्टलवर टाकण्यात येणार आहेत.
24 मार्चला भारतामध्ये 3 आठवड्यांची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. भारतात कोरोनाग्रस्तांची संख्या 1225पर्यंत पोहचली आहे. त्यामुळे घराबाहेर न पडण्याचे आवाहन प्रशासनाने नागरिकांना केले आहे.