लखनौ- उत्तर प्रदेशातील अनेक जिल्ह्यांमध्ये शुक्रवारी पावसाने धुमाकूळ घातला. वादळी वाऱ्यासह गारपीट आणि विजा कोसळल्याने राज्यात १९ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच अनेक जण जखमी झाले आहेत. मृतांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
उत्तर प्रदेशात वादळी पावसाचे थैमान, १९ जणांचा मृत्यू - storm-hits-the-ruination-in-many-districts
प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले असून पंचनामा करून नुकसानग्रस्तांना भरपाई देण्याचे जाहीर करण्यात आले आहेत.
गुरुवारी सायंकाळी उत्तर प्रदेशातील मैनपुरी, कासगंज, एटा, कनौज यांसह अनेक जिल्ह्यांत वादळी वाऱ्यांसह जोरदार अतिवृष्टी झाली. यावेळी अनेक ठिकाणी विजाही कोसळल्या. या सर्व घटनेत विविध जिल्ह्यातील एकून १९ जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये मैनपुरी जिल्ह्यातील सर्वाधिक ६ जणांचा समावेश असून २४ जण गंभीर जखमी झाले आहेत. तसेच या वादळाने अनेक घरांचे आणि पिकांचेही नुकसान झाले आहे.
जनपद जिल्ह्यात पावसामुळे भिंत कोसळून एका कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला आहे. याच जिल्ह्यात या वादळी पावसामुळे घरावरील पत्रे उडाल्याने, तसेच झाडे पडून अनेक जण जखमी झाले आहेत. एटा जिल्ह्यात घरावरील पत्रे अंगावर पडून आणि वीज कोसळून दोघांचा मृत्यू झाला आहे. जखमींमध्ये गुराखी आणि शेतमजूरांचा सर्वाधिक समावेश आहे. प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले असून पंचनामा करून नुकसानग्रस्तांना भरपाई देण्याचे जाहीर करण्यात आले आहे.