जोधपूर - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात लॉकडाऊन करण्यात आला होता. हा लॉकडाऊन काल(मंगळवारी) ३ मे पर्यंत वाढवण्यात आला. दरम्यान, आरोग्य विभागातील अधिकारी, कर्मचारी आणि इतर स्टाफ तसेच पोलिसांसह अन्य कर्मचारी जे आपल्या जीवाची पर्वा न करता दिवसरात्र एक करून देशसेवेत लागते आहेत. जोधपूरमध्ये बीजेएस नटबस्तीमध्ये सर्वेसाठी गेलेल्या बीएलओच्या चमूवर येथील रहिवाशांनी हल्ला केला. बीएलओ आणि त्यांच्या टीमवर दगडफेक करून मारहाण करण्यात आली. दरम्यान, या टीमने तेथून कसाबसा पळ काढला.
कोरोना : जोधपुरात डोर-टू-डोर सर्वेक्षण, मात्र स्क्रिनिंगसाठी गेलेल्या टीमवर नागरिकांची दगडफेक - डोर-टू-डोर सर्वेक्षण
राजस्थानमधील जोधपूर येथे एका ठिकाणी डोर-टू-डोर सर्वेसाठी गेलेल्या बीएलओच्या टीमवर तेथील लोकांनी दगडफेक केली. या घटनेत बीएलओ यांच्या डोक्याला मार लागला आहे.
एकीकडे कोरोना विषाणूचा सामना करण्यासाठी आरोग्य विभाग, पोलीस, स्वच्छता सेवक, कर्मचारी आदि जीवाचे रान करत आहेत. तर, दुसरीकडे त्यांना मारहाण केल्याच्याही घटना पुढे येत आहेत. राजस्थानच्या जोधपूरमध्येही अशीच एक घटना पुढे आली आहे. यामध्ये जोधपूरच्या एका ठिकाणी सर्वेसाठी गेलेल्या बीएलओच्या टीमवर तेथील लोकांनी दगडफेक केली. या घटनेत बीएलओ यांच्या डोक्याला मार लागला आहे.
या घटने दरम्यान झालेल्या मारहाणीमध्ये बीएलओ रामनिवास यांच्या डोक्याला मार लागला. त्यांनी या प्रकाराबाबत स्थानिक लोकप्रतिनिधींना सूचना दिली. त्यानंतर, काँग्रेसचे नेते हनुमान सिंह खांगटा यांनी घटनास्थळी पोहचून वस्तीतील नागरिकांशी चर्चा करून प्रकरण शांत केले. यासोबतच, शासकीय कर्मचाऱ्यांबरोबर अशा प्रकारचा व्यवहार केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल, अशा सूचनाही दिल्या. सध्या बीएलओ यांच्यामार्फत पोलिसात या घटनेबाबत कुठलीही तक्रार दाखल करण्यात आलेली नाही.