लखनौ- उत्तर प्रदेश राज्यातील मुरादाबाद जिल्ह्यातही कोरोना विषाणूचा कहर सुरू आहे. कोरोना विषाणू बाधित रुग्णाच्या मृत्यूनंतर मृताच्या नातेवाईंकांच्या तपासणीसाठी आरोग्य विभागाचे एक नागफणी या गावात गेले होते. मात्र नागफनी या गावातील स्थानिक नागरिकांनी पोलीस आणि आरोग्य पथकावर दगडफेक केल्याची घटना घडली आहे. यामध्ये आरोग्य विभाग आणि पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी घटनास्थळावरून एकाला ताब्यात घेतले आहे. त्यानंतर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
CORONA : यूपीमधील मुरादाबाद जिल्ह्यात आरोग्य तपासणी पथकावर दगडफेक - मुरादाबाद
जिल्ह्यात 13 एप्रिलला 53 जणांचा कोरोना विषाणू तपासणी अहवाल प्राप्त झाला होता. त्यामध्ये 17 जण कोरोना विषाणूने बाधित होते. त्यापैकीच एक नागफनी येथील सरताज या रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता आणि त्याच दिवशी त्याचा मृत्यू झाला होता.
जिल्ह्यात 13 एप्रिलला 53 जणांचा कोरोना विषाणू तपासणी अहवाल प्राप्त झाला होता. त्यामध्ये 17 जण कोरोना विषाणूने बाधित होते. त्यापैकीच एक नागफनी येथील सरताज या रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता आणि त्याचदिवशी त्याचा मृत्यू झाला होता. या दगडफेकीत वाहनांची मोठ्या प्रमाणात तोडफोड झाली आहे.
आरोग्य विभागाने मृत व्यक्ती ज्या परिसरात राहात होता, त्या परिसराला कोरोना संक्रमित परिसर म्हणून घोषित केले होते. त्यानंतर आरोग्य विभागातील कर्मचारी पोलीस फौजफाट्यासह परिसरातील रहिवाशांच्या आरोग्य तपासणीसाठी दाखल झाले. मात्र, यावेळी स्थानिकांनी या पथकावर दगड फेक केली. उत्तर प्रदेशमधील कोरोना बाधितांचा आकडा 705वर पोहोचला आहे.