नवी दिल्ली - देशात लॉकडाऊन सुरू होऊन दीड महिन्यापेक्षा जास्त काळ झाला आहे. लॉकडाऊनमुळे रोजगार ठप्प असल्याने अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. अशा नागरिकांसाठी सरकारतर्फे धान्य वाटप केले जात आहे. मात्र, काही ठिकाणी तासन् तास रांगेत उभा राहूनही नागरिकांना धान्य मिळत नाही, त्यामुळे नागरिक संताप व्यक्त करत आहेत. दिल्लीच्या प्रेमनगर भागात तर धान्य न मिळाल्याने नागरिकांनी धान्याचे वाटप होत असलेल्या शाळेवर तुफान दगडफेक केली.
दिल्लीत धान्य वाटप करणाऱ्या शाळेवर नागरिकांची दगडफेक - प्रेमनगर शाळा दगडफेक न्यूज
गरीब नागरिकांसाठी सरकारतर्फे धान्य वाटप केले जात आहे. मात्र, काही ठिकाणी तासन् तास रांगेत उभा राहूनही नागरिकांना धान्य मिळत नाही त्यामुळे नागरिक संताप व्यक्त करत आहेत. दिल्लीच्या प्रेमनगर भागात तर धान्य न मिळाल्याने नागरिकांनी धान्याचे वाटप होत असलेल्या शाळेवर तुफान दगडफेक केली.
किराडी भागातील प्रेमनगर येथे सरकारतर्फे धान्य आले आहे. मात्र, धान्याचे वाटप कोणाला करायचे ती यादी अद्याप आलेली नाही. त्या अगोदरच नागरिकांना धान्य आल्याची माहिती मिळाली. नागरिकांनी धान्यासाठी शाळेत लांबचलांब रांगा लावल्या मात्र, धान्य वाटपाचे आदेश नसल्याने वाटप सुरू करणे शक्य नाही. संतप्त नागरिकांनी शाळेवर दगडफेक करत सरकारविरोधी घोषणा दिल्या, अशी माहिती शाळेतील कर्मचाऱयांनी दिली.
धान्य घेण्यासाठी आम्हाला टोकन दिले गेले आहेत. त्यामुळेच आम्ही धान्य घेण्यासाठी आलो आहोत. मात्र, उन्हात थांबूनही धान्याचे वाटप केले जात नाही. परिणामी आम्हाला आक्रमक होणे भाग पडले, असे नागरिकांचे म्हणने आहे. पोलिसांना या प्रकरणाची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी जाऊन परिस्थिती नियंत्रणात आणली.