महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

'स्टॅचू ऑफ युनिटी' पर्यटकांसाठी १७ ऑक्टोबरपासून होणार खुला

स्टॅचू ऑफ युनिटी हे पर्यटन स्थळ कोविड १९ च्या संपूर्ण नियमांचे पालन करुन पर्यटकांसाठी खुला करण्यात येणार आहे. पर्यटकांना येथे आल्यानंतर कोविड १९ च्या सर्व नियमांचे पालन करावे लागणे सक्तीचे करण्यात आले आहे. सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाचे पालन करुन दिवसाला 2,500 पर्यटकांना येथे भेट देण्याची परवानगी देण्यात आली असून यातील फक्त 500 पर्यटकांना १९३ मीटर उंचीवरील गॅलरीत प्रवेश देण्यात येणार आहे.

Statue of Unity to reopen from Day 1 of Navratri
स्टॅचू ऑफ युनिटी पर्यटकांसाठी १७ ऑक्टोबरपासून होणार खुला

By

Published : Oct 14, 2020, 7:30 AM IST

गांधी नगर -कोरोना महामारीमुळे संपूर्ण भारतातील धार्मिक व पर्यटन स्थळे मागील सहा महिन्यांपासून बंद आहेत. याच पार्श्वभूमीवर गुजरातमधील जगातील सर्वात उंच पुतळा म्हणजे स्टॅचू ऑफ युनिटी ही बंद ठेवण्यात आले होते. परंतू आता अनलॉकच्या प्रक्रियेत व नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर पर्यटकांसाठी १७ ऑक्टोबरपासून पुन्हा सुरू करण्यात येणार आहे.

अनलॉकची प्रक्रिया देशभरासह गुजरातमध्ये ही सुरू आहे. त्याचाच भाग म्हणून सरदार सरोवर नर्मदा निगम लिमिटेडच्या निगराणीत असलेला स्टॅच्यू ऑफ युनिटी पर्यटकांसाठी खुला करण्याचे ठरविले आहे. तसेच यापूर्वी पर्यटकांचे आकर्षणाचे केंद्र असलेले केवाडिया साईट, जंगल सफारी, चिल्ड्रन्स न्युट्रीशन पार्क, एकता मॉल आणि इतर ठिकाणी खुली करण्यात आली आहेत. या ठिकाणी पर्यटकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

स्टॅचू ऑफ युनिटी हे पर्यटन स्थळ कोविड १९ च्या संपूर्ण नियमांचे पालन करुन पर्यटकांसाठी खुला करण्यात येणार आहे. पर्यटकांना येथे आल्यानंतर कोविड १९ च्या सर्व नियमांचे पालन करावे लागणे सक्तीचे करण्यात आले आहे. सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाचे पालन करुन दिवसाला 2,500 पर्यटकांना येथे भेट देण्याची परवानगी देण्यात आली असून यातील फक्त 500 पर्यटकांना १९३ मीटर उंचीवरील गॅलरीत प्रवेश देण्यात येणार आहे.

स्टॅच्यू ऑफ युनिटीला भेट देण्यासाठी ऑनलाईन तिकीट विक्रीची सुविधा उपलब्ध करण्यात आली असून येथे पर्यटकांना दोन तास वेळ दिला जाणार आहे. तिकीट विक्री www.soutickets.in. या अधिकृत वेबसाईटवरुन होणार आहे. मॅन्यूअल तिकीट विक्री संपूर्णपणे बंद असणार आहे. तसेच या ठिकाणा आल्यानंतर मास्क नेसणे, हात सॅनिटाईज करणे आणि शारीरिक अंतर पाळणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच ३१ ऑक्टोबरच्या नॅशनल युनिटी डेला पंतप्रधान नरेंद्र मोदी केवाडिया साईटला भेट देण्याची शक्यता आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details