महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

इतिहासातील एक महान कवी अस्तित्वाचा संघर्ष करतोय? - जैन धर्माचे पहिले तिर्थकर ऋषभदेव

सोमवारी सकाळी तामिळनाडू राज्यातील तंजावूरमधील पिल्लयारपट्टी या ठिकाणी तिरुवल्लूवर यांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली. यानंतर तिरुवल्लूवर यांच्या साहित्याचा मागोवा घेणार 'ईटीव्ही भारत'चा विशेष रिपोर्ट.

तिरुवल्लुवर

By

Published : Nov 4, 2019, 7:13 PM IST

चैन्नई - एक सर्वसामान्य व्यक्ती गृहस्थ आणि गृहस्थस्वामी आयुष्यासोबतच एक दिव्य आयुष्य देखील जगू शकतो, शुद्ध आणि पवित्र जीवन जगण्यासाठी परिवार सोडून संन्यास घेण्याची आवश्यकता नाही, हे तत्वज्ञान ज्या कवीने आपल्या कवितांमधून इसवी सनाच्या सहाव्या शतकात जगासमोर मांडले त्याच प्रख्यात तमीळ कवी, तत्वज्ञ तिरुवल्लुवर यांच्या पुतळ्याची काही समाजकंटकांनी आज सोमवारी तोडफोड केली आहे. तसेच त्यांच्या पुतळ्यावर शाई फेकल्याचा धक्कादायक प्रकार येथे समोर आला आहे.

समाजकंटकांनी पुतळ्याची केलेली विटंबना

तमिळनाडू राज्यातील तंजावूर मधील पिल्लयारपट्टी या ठिकाणी तिरुवल्लुवर यांचा पुतळा उभारण्यात आला आहे. सोमवारी सकाळी काही समाजकंटकांनी या पुतळ्याची तोडफोड केली व पुतळ्यावार शाई फेकल्याचा धक्कादायक प्रकार तेथील स्थानिक नागरिकांच्या निर्दशनास आला. यानंतर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळ गाठून अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला. तसेच, पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे, अशी माहिती सुत्रांनी दिली.

कोण आहेत तिरुवल्लूवर -

तिरुवल्लुरांच्या जन्माविषयी अनेक दंतकथा प्रसिद्ध आहेत. शैव, वैष्णव, जैन आणि बैद्ध सर्म्पदायांचा ग्रथांमध्ये त्यांच्या संबधी उल्लेख आढळतात. मात्र, त्यांच्या धर्माविषयी कोणतेही ठोस पुरावे सापडत नाहीत. तिरुक्कुरल या त्यांच्या साहित्याच्या सुरुवातीला त्यांनी सर्व शक्तीमान ईश्वराला प्रणाम केला आहे. यामुळे तिरुवल्लूर हे आस्तिक असून ते हिंदू होते, असे काही इतिहासकारांचे मत आहे. तर कार्ल ग्रौल या विदेशी लेखकाच्या मते तिरुवल्लूर हे बोद्ध धर्मीय असल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र, जैन इतिहासकारांच्या मते तिरुवल्लूवर हे एक जैन मुनी होते. कारण, त्यांनी तिरुक्कुरल ग्रंथाचा पहिला अध्याय जैन धर्माचे पहिले तिर्थकर ऋषभदेव यांना समर्पित केला आहे.

तथाकथीत दंतकथांनुसार तमिळनाडूच्या मदुरैमध्ये 'तमिळ संगम' ही विद्वानांची सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत सर्वप्रथम तिरुवल्लुरांची जगाला ओळख झाली. यानंतर पांड्य राज्याच्या काळात त्यांनी कवी म्हणून प्रसिद्धी मिळवली. तर काही इतिहासकारांच्या मते त्यांच्या जन्म मायलापूर (वर्तमानातील मद्रास शहराचा एक भाग) येथे झाला असून त्यांनी तिरुक्कुरूल या त्यांच्या साहित्याच्या संपादनासाठी पाड्य राजांचा 'राजाश्रय' घेतला होता. तर कन्याकुमारी ऐतिहासिक आणि सांस्कृतिक शोध केंद्राने केलल्या दाव्यानुसार वल्लुवर हे एक राजा असून त्यांनी कन्याकुमारीतील पहाडी भागातील वल्लुवनाडू प्रदेशावर राज्य केले होते, असा दावा करण्यात आला आहे.

हेही वाचा -अचूक खड्डे मोजा अन् ५ हजार बक्षीस मिळवा; नांदेडमध्ये अनोखी स्पर्धा..!

तिरुक्कुरल साहित्याविषयी -


तिरुक्कुरल हे गिता, कुराण आणि बायबल नंतर सर्वाधीक भाषांतरीत करण्यात आलेले साहीत्य आहे. हे साहीत्य क्रमश: धर्म, अर्थ आणि काम या तिन विभागांमध्ये विभागलेले आहे. प्रत्येत विभागात क्रमश: 38, 70 आणि 25 अध्याय आहेत. प्रत्येक अध्यायात 10 कुरल आहेत. कुरल म्हणजे मुक्त काव्य. मात्र, हे लेखन मुक्त काव्य असूनही प्रत्येक विषयाची क्रम बद्धता आणि विषयांची व्यापकता या लेखनाला विशेष बनवते. धर्म विभागात कर्म-कांड, ईश्वर स्तुती, गृहस्थ जीवन, संन्यास, अध्यात्म, नियती या सगळ्या विषयांवर सखोल भाष्य करण्यात आले आहे. तर, अर्थात राजकारण, प्रतिनिधींचे आदर्श, मंत्र्याचे कर्तव्य, राज्याची अर्थव्यवस्था, सैन्याची व्यवस्था या विषयावर विपूल मार्गदर्शन करण्यात आले आहे. तर कामाअंतर्गत सामाजिक जीवनातील आचारसंहितेची चर्चा करण्यात आली आहे.

काय आहे तिरुवल्लुवर विवाद -

काही दिवसांपूर्वी तमिळनाडू भाजपने त्यांच्या ट्वीटरवरुन तिरुवल्लुवरांचे भगव्या कपड्यातील चित्र प्रसिद्ध केले होते. यानंतर तेथील द्रवीड लोकांनी याचा कडाडून विरोध केला. दरम्यान, आज घडलेला प्रकाराशी या घटनेचा काही संबंध आहे की नाही सांगणे कठीण असले तरी तशा शक्यता सध्या वर्तवल्या जात आहेत.

तमिळनाडू बिजेपीचे प्रसारीत चित्र

हेही वाचा -मला विश्वास, नवीन सरकार लवकरच स्थापन होईल - देवेंद्र फडणवीस

ABOUT THE AUTHOR

...view details