गांधीनगर - गुजरातमध्ये महात्मा गांधीच्या पुतळ्याची अज्ञात व्यक्तींनी तोडफोड केली आहे. ही घटना अमरेली जिल्ह्यातील 'हरी कृष्णा लेक' येथे काल(शुक्रवारी) रात्री घडली.
याप्रकरणी अज्ञात व्यक्तिविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस तपास सुरू आहे.
गुजरातमध्ये महात्मा गांधींच्या पुतळ्याची तोडफोड, गुन्हा दाखल - अमरेली गुजरात
गुजरातमध्ये महात्मा गांधींच्या पुतळ्याची अज्ञात व्यक्तींनी तोडफोड केली आहे. ही घटना अमरेली जिल्ह्यातील 'हरी कृष्णा लेक' येथे काल (शुक्रवारी) रात्री घडली.
गांधींच्या पुतळ्याची तोडफोड
देशभरात नुकतेच सावरकर आणि नथुराम गोडसे यांच्यासंबधीत पुस्तिकेवरून वाद पेटला होता. मध्यप्रदेशातील भोपाळ येथे काँग्रेस सेवा दल प्रशिक्षण कार्यक्रमात सावरकर आणि गोडसे यांच्यासंबधीत वादग्रस्त पुस्तिका वाटण्यात आली होती. सावरकर आणि गोडसे यांच्यामध्ये समलैंगिक संबध असल्याचे पुस्तिकेमध्ये म्हटले होते. यावरून काँग्रेस आणि भाजप नेत्यांमध्ये चांगलीच जुंपली होती. हिंदू महासभेचे अध्यक्ष स्वामी चक्रपाणी यांनी राहुल गांधीही समलैंगिक असल्याचे म्हटले होते.