बेगुसराय -केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांनी डॉ. आंबेडकरांच्या पुतळ्याला हार घातल्याने भाकप आणि राजदच्या कार्यकर्त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा गंगाजलाने शुद्ध केला आहे. सीएए कायद्याच्या समर्थनार्थ शहरातील बलिया विभागात डॉ. आंबेडकर उद्यानामध्ये सभा आयोजीत करण्यात आली होती. त्यावेळी गिरिराज सिंह यांनी डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला होता.
भाकप नेता सनोज सरोज आणि राजदचे नेते विकास पासवान यांनी गंगाजलाने आंबेडकरांचा पुतळा शुद्ध केला. यावेळी भाकप आणि राजदच्या कार्यकर्त्यांनी जय भीम आणि म. ज्योतिबा फुले यांच्या जयजयकाराच्या घोषणा दिल्या. दरम्यान पुतळा शुद्धिकरण करतानाचा व्हिडीओदेखील समाजमाध्यमांवर शेअर करण्यात आला आहे.