महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

सीतामढीमध्ये गोळीबारानंतर सिमेवर जवान तैनात; नेपाळ पोलिसांनी अपहरण केलेल्या भारतीयाची सुटका - बिहार सीतामढी न्यूज

बिहारच्या सीतामढी जिल्ह्यातील लालबंदी सीमेजवळ शुक्रवारी नेपाळी पोलिसांनी शेतात काम करणाऱ्या भारतीय मजुरावर गोळीबार केल्याची घटना घडली. या घटनेत एका मजुराचा मृत्यू झाला असून इतर तीन मजूर गंभीर जखमी झाले.

सीतामढी
सीतामढी

By

Published : Jun 13, 2020, 5:38 PM IST

नवी दिल्ली - बिहारच्या सीतामढी जिल्ह्यातील लालबंदी सीमेजवळ शुक्रवारी नेपाळी पोलिसांनी शेतात काम करणाऱ्या भारतीय मजुरावर गोळीबार केल्याची घटना घडली. या घटनेत एका मजुराचा मृत्यू झाला असून इतर तीन मजुर गंभीर जखमी झाले. नेपाळी पोलीस भारतीय हद्दीतल सोनबरसा ठाण्याअंतर्गत असलेल्या जानकीनगर ग्रामीण भागातील रहिवासी लगान राय यांना बंदी करून नेपाळमधील परसा ठाण्यात घेऊन गेले.

डीएम अभिलाषा कुमारी शर्मा आणि एसपी अनिल कुमार यांच्या पुढाकारानंतर ओलिस ठेवलेल्या लगन राय यांना नेपाळच्या पोलिसांनी शनिवारी सोडले. नेपाळहून आल्यानंतर शेतकरी लगन राय यांनी आपली शोकांतिका सांगितली.

दोन्ही देशांच्या सीमेवर गोळीबार झाल्याच्या घटनेनंतर भारत-नेपाळ सीमेवर तणाव आहे. सीमेला लागून असलेल्या गावात शांतता आहे. त्याचवेळी गोळीबाराच्या घटनेबाबत लोकांमध्ये रोषही आहे. दोन्ही देशांचे सैनिक आपापल्या सीमेवर तैनात आहेत. भारतीय सीमेवर एसएसबीचे जवान तैनात आहेत. तर त्याच वेळी नेपाळच्या सीमेवर नेपाळ सशस्त्र दलाचे जवान तैनात आहेत.

नेपाळ पोलिसांनी गोळीबार केल्याच्या घटनेत मृत नागेश्वर राय यांचा मुलगा विकेश रायचा जागीच मृत्यू झाला. विकेशच्या मृत्यूनंतर स्थानिकांनी लगान रायच्या सुटकेसंदर्भात विकेशच्या मृतदेहासह सीमेवर निदर्शने केली होती. नेपाळकडून लगन रायची सुटका झाल्यानंतर विकेशच्या मृतदेहावर अंतिम संस्कार करण्यात आले.

ABOUT THE AUTHOR

...view details