नवी दिल्ली -भारतामध्ये कोरोनाबाधित रुग्णाची संख्या 341 वर पोहोचली आहे. कोरोना विषाणूचा वाढता प्रसार पाहता केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आज पत्रकार परिषद घेतली. केंद्र सरकारने कोरोनाचे सर्वांत जास्त रुग्ण असलेल्या 75 जिल्ह्यांना लॉकडाऊन करण्याचे निर्देश राज्य प्रशासनाला दिले आहेत. यामध्ये केवळ अत्यावश्यक सेवाच सुरू ठेवण्याचे आदेश देण्यात आल्याचे आरोग्य सचिव लव अग्रवाल यांनी सांगितले.
कोरोना दहशत : देशातील 75 जिल्हे लॉकडाऊन करण्याचे राज्यांना निर्देश - JANTA CURFEW
केंद्र सरकारने कोरोनाचे सर्वांत जास्त रुग्ण असलेल्या 75 जिल्ह्यांना लॉकडाऊन करण्याचे निर्देश राज्य प्रशासनाला दिले आहेत. यामध्ये केवळ अत्यावश्यक सेवाच सुरू ठेवण्याचे आदेश देण्यात आल्याचे आरोग्य सचिव लव अग्रवाल यांनी सांगितले.
कोरोना प्रसाराची साखळी तोडली तर कोरोनाचा प्रसार थांबवण्यास मदत होईल. कोरोना विषाणूचे लक्षणे आढळल्यास चाचणी करणे गरजेचे आहे. आतापर्यंत आम्ही 15 ते 17 हजार चाचण्या केल्या आहेत. एका दिवसामध्ये 10 हजार चाचण्या करण्याची आमची क्षमता आहे. म्हणजेच, एका आठवड्यामध्ये 50 ते 70 हजार चाचण्या आम्ही करू शकतो, आयसीएमआरचे डॉक्टर बलराम भार्गव यांनी सांगितले.
देशामध्ये कोरोना बाधित रुग्णाची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे पंतप्रधान मोदींनी आवाहन केल्यानुसार आज देशभरामध्ये जनता कर्फ्यू पाळण्यात येत आहे. आज (रविवारी) सकाळी ७ वाजेपासून बंद सुरू झाला असून रात्री नऊ पर्यंत पाळण्यात येणार आहे. देशभरातील नागरिकांनी घरातच राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.