तिरुअनंतपूरम- केरळात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे राज्यातील वायनाड जिल्ह्यातील मल्लापूरम आणि पुथूमाला येथे भूस्खलन झाले होते. त्यामुळे ही दोन्ही गावे उद्ध्वस्त झाली होती. या घटनेमुळे मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली आहे. आता मृतांना शोधण्यासाठी प्रशासनाकडून 'ग्राउंड पेनिट्रेटींग रडार' चा वापर करण्यात येणार आहे.
दरम्यान, राज्य सरकारने राज्यव्यापी आपत्ती अहवाला जारी केला आहे. त्यानुसार ८ ऑगस्ट नंतर राज्यात आलेल्या महासंकटामुळे आतापर्यंत ११६ लोकांनी आपला जीव गमावला आहे. त्याचबरोबर ८३,०४३ लोक ५१९ मदत शिबीरांमध्ये वास्तव्यास आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मल्लापूरम येथील ५३ लोकांनी तर वायनाड येथील १२ त्याचबरोबर कोझीकोड येथील १७ लोकांनी आपला जीव गमवला आहे. राज्याच्या उत्तर भागातील ३ जिल्ह्यातील २६ लोक अजूनही बेपत्ता आहेत. १,२०४ घरांची पडझड झाली आहे.