नवी दिल्ली - राज्यात सुमारे महिनाभर सुरू असलेला मुख्यमंत्रीपदावरून सुरू झालेला सत्तापेच सुटला आहे. शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षांची महाविकास आघाडीची सत्ता स्थापन झाली आहे. त्यावरून समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी भाजपचे अच्छे दिन संपले आहेत, अशी टीका टि्वट करून केली आहे.
महाराष्ट्रामध्ये नव्या राजकीय युगाला सुरुवात, भाजपचे अच्छे दिन संपले - अखिलेश यादव - महाराष्ट्र विकास आघाडी राज्यात सत्तेवर
महाराष्ट्रातील धर्मनिरपेक्षता (सेक्युलरिझम) आणि समाजवादाच्या (सोशॅलिझम) या युतीने एका नव्या राजकीय युगाला सुरुवात केली आहे,असे अखिलेश यादव यांनी टि्वट करुन म्हटले आहे.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरूवारी राज्याचे २९ वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. अखिलेश यादव यांनी उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा दिल्या आहेत. महाराष्ट्रातील धर्मनिरपेक्षता (सेक्युलरिझम) आणि समाजवादाच्या (सोशॅलिझम) या युतीने एका नव्या राजकीय युगाला सुरुवात केली आहे. आता भाजपचे अच्छे दिन संपले आहेत’, असे अखिलेश यादव यांनी टि्वट करून भाजपवर निशाणा साधला.
महाराष्ट्र विकास आघाडी राज्यात सत्तेवर आली आहे. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यांच्यासोबत सहा मंत्र्यांनी शपथ घेतली. यात एकनाथ शिंदे, सुभाष देसाई, जयंत पाटील, छगन भुजबळ, बाळासाहेब थोरात आणि नितीन राऊत यांनी शपथ घेतली.