हैदराबाद - जगभरामध्ये कोरोना विषाणूने थैमान घातले असून भारतामध्येही कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा वाढतच चालला आहे. आंध्र प्रदेश राजभवनातील स्टाफ परिचारिकेला कोरोनाची बाधा झाली आहे. ही परिचारिका विजयवाडा येथील राज्यपालांच्या अधिकृत निवासस्थानी असलेल्या वैद्यकीय पथकाची सदस्य होती.
आंध्र प्रदेश राजभवनातील परिचारिकेला कोरोनाची लागण - आंध्र प्रदेश
आंध्र प्रदेश राजभवनातील स्टाफ परिचारिकेला कोरोनाची बाधा झाली आहे. ही परिचारिका विजयवाडा येथील राज्यपालांच्या अधिकृत निवासस्थानी असलेल्या वैद्यकीय पथकाची सदस्य होती.
आंध्र प्रदेशमधील एका खासदार कुटुंबालाही कोरोनाची लागण झाली आहे. वायएसआर काँग्रेस आणि कुरनूलचे खासदार संजीव कुमार यांच्या कुटुंबातील 6 सदस्यांना कोरोनाची बाधा झाली आहे. यामध्ये त्यांचे 80 वर्षीय वडील, दोन भाऊ, एक भाचा आणि पत्नींचा समावेश आहे. त्यांच्यावर कुरनूल सरकारी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
दरम्यान विजयवाडामधील काही पोलीस अधिकाऱ्यांनाही कोरोनची बाधा झाल्याचे समोर येत आहे. पोलिसांनी लोकांना लॉकडाऊनच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन केले. कृष्णा जिल्ह्यात 177 कोरोनाबाधित आढळली आहेत. तर एकट्या विजयवाडा शहरात 150 कोरोनाबाधित आढळले आहेत.