श्रीनगर - सोशल मीडियावर सध्या एक फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा फोटो श्रीनगर येथील असून यामध्ये वरीष्ठ पोलीस अधीक्षक वीरमरण आलेल्या पोलीस निरिक्षकाच्या मुलाला घेऊन जाताना रडताना दिसत आहेत. या फोटोला पाहून अनेकांनी भावनांना वाट मोकळी करून दिली आहे.
वीरपित्याच्या अंत्यदर्शनासाठी चिमुकल्याला घेऊन जाताना वरीष्ठ अधिकाऱ्याला अश्रू अनावर - बढती
वरीष्ठ पोलीस अधीक्षक हसीब मुघल यांनी अरशद खान यांचा ४ वर्षीय मुलगा उहबान याला उचलून घेतले. परंतु, उहबानला घेवून जाताना हसीब यांना रडू कोसळले.
![वीरपित्याच्या अंत्यदर्शनासाठी चिमुकल्याला घेऊन जाताना वरीष्ठ अधिकाऱ्याला अश्रू अनावर](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-3590424-thumbnail-3x2-jammu.jpg)
मागील बुधवारी केपी रोड, अनंतनाग येथे दहशतवाद्यांनी केलेल्या फिदायीन हल्ल्यात सीआरपीएफच्या ५ जवानांना वीरमरण आले होते. तर, दहशतवाद्याला ठार करण्यात जवानांना यश आले होते. या हल्ल्यात पोलीस निरीक्षक अरशद खान गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर दिल्लीतील एम्स रुग्णालयात उपचार सुरू होते. परंतु, रविवारी त्यांना वीरमरण आले. सोमवारी त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्यसंस्काराला उपस्थित असलेले वरीष्ठ पोलीस अधीक्षक हसीब मुघल यांनी अरशद खान यांचा ४ वर्षीय मुलगा उहबान याला उचलून घेतले. परंतु, उहबानला घेवून जाताना हसीब यांना रडू कोसळले. त्यांचा हा फोटो जम्मू-काश्मीर पोलीसांच्या ट्विटरवरुन पोस्ट करण्यात आला आहे.
श्रीनगर येथील मुळ राहिवासी असलेले अरशद खान २००२ साली राज्य पोलीस दलात भर्ती झाले होते. सदर पोलीस ठाणे, अनंतनाग येथे एसएचओ म्हणून खान यांची बढती झाली होती. खान यांच्या पश्च्यात पत्नी, दोन मुले, आई-वडील आणि लहान भाऊ असा परिवार आहे.