महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

श्रीलंकेचे पंतप्रधान महिंदा राजपक्षे ४ दिवसांच्या भारत दौऱ्यावर

श्रीलंकेचे पंतप्रधान महिंदा राजपक्षे आज (शुक्रवारी) चार दिवसीय भारताच्या दौऱ्यावर आले आहेत.

By

Published : Feb 7, 2020, 7:56 PM IST

Mahinda Rajapaksa
महिंदा राजपक्षे यांचे स्वागत करताना संजय धोत्रे

नवी दिल्ली - श्रीलंकेचे पंतप्रधान महिंदा राजपक्षे आज (शुक्रवारी) चार दिवसीय भारताच्या दौऱ्यावर आले आहेत. केंद्रीय मानव संसाधन राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी त्यांचे दिल्लीत स्वागत केले.


महिंदा राजपक्षे उद्या (शनिवारी) पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याशी चर्चा करणार आहेत. त्यानंतर परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशीही ते चर्चा करणार आहेत. राजनैतिक भेटीनंतर राजपक्षे राजघाट येथे जाऊन महात्मा गांधींना आदरांजली वाहणार आहेत.
रविवारी राजपक्षे उत्तरप्रदेशातील काशी विश्वनाथ आणि सारनाथ बौद्ध मंदिरात जाणार आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यातील सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेण्यात आला आहे. सोमवारी म्हणजे १० फेब्रुवारीला राजपक्षे बिहारमधील बौद्धगया येथील महाबोधी मंदीराला भेट देणार आहेत. त्यानंतर आंध्रप्रदेशातील तिरुपती मंदिराच्या दर्शनासाठी जाणार आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details