महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

श्रीकृष्ण जन्मभूमी वाद : मशीद हटवण्याच्या याचिकेवर न्यायालयाने राखून ठेवला निर्णय - श्रीकृष्ण जन्मभूमी वाद याचिका निर्णय

राम मंदिर आणि बाबरी मशीदीचा वाद मिटल्यानंतर आता मथुरेमध्ये श्रीकृष्ण जन्मभूमीचा वाद सुरू आहे. त्याठिकाणी असणारी मशीद काढून टाकण्याची मागणी करणारी एक याचिका मथुरा जिल्हा न्यायालयात दाखल आहे. त्यावर सुनावणी झाली मात्र, त्याबाबत न्यायालयाने आपला निर्णय राखून ठेवला आहे.

court
न्यायालय

By

Published : Jan 29, 2021, 8:27 AM IST

लखनऊ - श्रीकृष्ण जन्मभूमी जमिनीच्या वादावर मथुरा जिल्हा न्यायालयात काल (गुरुवार) सुनावणी झाली. न्यायालयाने याबाबत काहीही निर्णय न देता तो राखून ठेवला आहे. मथुरेतील श्रीकृष्ण मंदिराच्या आवारातील शाही ईदगाह मशीद हटवण्याची मागणी आणि मंदिराचा १३.३७ एकरचा परिसर मंदिराच्या मालकीचा असल्याचा दावा याचिकाकर्त्यांनी केली आहे. २ ऑक्टोबर २०२०ला न्यायालयाने याचिका फेटाळली होती. मात्र, नंतर याचिका दाखल करून घेतली गेली.

मशिद हटवण्याच्या याचिकेवर न्यायालयाने निर्णय राखून ठेवला आहे

मशीद बेकायदेशीर -

श्रीकृष्ण जन्मस्थळाचा परिसर सुमारे साडेतेरा एकरचा आहे. या परिसरात एक मंदिर आणि शाही ईदगाह मशीद आहे. ही मशीद हिंदू मंदिराचा काही भाग पाडून बांधण्यात आल्याचा दावा याचिकाकर्त्यांनी केला आहे. २६ सप्टेंबर २०२०ला काही भाविकांनी या प्रकरणी मथुरा जिल्हा न्यायालयात याचिका दाखल केली होती. मुघल सम्राट औरंगजेबाने १७ व्या शतकात हिंदू मंदिराचा काही भाग पाडून त्याजागी मशीद बांधली होती. मशीद बेकायदेशीर जागेवर असून मंदिराच्या जागेतील अतिक्रमण काढून टाकण्याची मागणी याचिकाकर्त्यांनी केली आहे.

१९९१ चा धार्मिक श्रद्धास्थाने कायदा -

२ ऑक्टोबरला न्यायालयाने धार्मिक श्रद्धास्थाने कायदा १९९१ चा दाखला देत याचिका स्वीकारण्यास नकार दिला होता. रामजन्मभूमी आणि बाबरी मशीद वाद निर्माण झाल्यानंतर केंद्र सरकारने १९९१ ला कायदा पास केला होता. त्यानुसार १५ ऑगस्ट १९४७ साली देशात धार्मिक स्थळांची जी स्थिती होती, तीच कायम राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे. धार्मिक स्थळांच्या मालकी हक्कांवरून वाद होऊ नये हा हेतू यामागे होता. मात्र, नंतर याचिका दाखल करून घेतली गेली.

ABOUT THE AUTHOR

...view details