नवी दिल्ली - रामायणात दर्शविल्याप्रमाणे ‘धर्म किंवा नीतिमत्तेचा सार्वत्रिक संदेश’ लोकांना समजून घ्यावा आणि तो प्रसारित करावा, असे आवाहन भारताचे उपराष्ट्रपती एम. वेंकैया नायडू यांनी केले आहे. नायडू यांनी 'मंदिर पुनर्बांधणी, मूल्ये जतन करून ठेवणे'या शीर्षकाखाली 17 भाषांमध्ये फेसबुक पोस्ट लिहिली आहे. त्यांनी अयोध्येत 5 ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या भगवान राम मंदिराच्या प्रस्तावित पुनर्बांधणीबद्दल आनंद व्यक्त केला आहे.
हा एक उत्सवाचा क्षण असल्याचे उपराष्ट्रपतींनी म्हटले आहे. ‘रामायणचे सार योग्य दृष्टीकोनातून समजून घेतले तर हा क्षण सामाजिक आध्यात्मिक पुनरुत्थान करू शकतो. रामायणाच्या कहाणीत धर्म किंवा नीतिमान वर्तनाविषयी एक अद्वितीय भारतीय दृष्टी सामावलेली आहे,’ असे उपराष्ट्रपती सचिवालयातील एका निवेदनात सांगण्यात आले आहे.
नायडू यांचा हवाला देत निवेदनात पुढे असेही म्हटले आहे की, "भगवान राम यांचे जीवन अनुकरणीय असून सामाजिक न्याय आणि जबाबदार नागरिक निर्माण करण्यासाठी रामायण आजही मार्गदर्शक आहे,"